नवी दिल्लीः ने भारतात Moto G 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने म्हटल्याप्रमाणे हा फोन सर्वात कमी किंमतीचा 5G स्मार्टफ़ोन असणार आहे. या फोनची किंमत २० हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. भारतात सध्या ५जी उपलब्ध नाही. परंतु, वर्ष - दोन वर्षात ५जी नेटवर्क येवू शकते. त्यामुळे युजर्संना ५जी स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास हा फोन उपयुक्त ठरू शकतो. वाचाः Moto G 5G सोबत कंपनी ऑफर्स सुद्धा देत आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ग्राहकांना या फोन खरेदीवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. यासाठी HDFC बँकेच्या क्रेडिट कार्टवरून ग्राहकांना पेमेंट करावे लागणार आहे. Moto G 5G या फोनची विक्री भारतात ७ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. या फोनला फ्लिपकार्टवरून खरेदी करता येवू शकते. कंपनीने या फोनला ग्रे आणि सिल्वर कलर ऑप्शनमध्ये लाँच केले आहे. वाचाः Moto G 5G चे खास फीचर्स Moto G 5G मध्ये ६.७ इंचाचा मॅक्स व्हिजन डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 चा आहे. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येवू शकतो. या फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच २० वॉटचा चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये तीन रियर कॅमेरा दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स, दुसरा ८ मेगापिक्सलचा तर तिसरा २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33sJr7v
Comments
Post a Comment