Yahoo: 15 डिसेंबरनंतर बंद होणार याहू ग्रुप; मेलची सेवाही बंद

नवी दिल्ली: मागील अनेक वर्षांपासून याहूच्या वापरात सातत्याने घट होताना दिसली आहे. त्यामुळे याहूने 15 डिसेंबरपासून याहू ग्रुप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 2017 मध्ये याहू विकत घेणा-या वेरिजोन या कंपनीने आज (मंगळवारी) आपला हा निर्णय जाहीर केला आहे. कधीकाळी याहू ही वेबवरील सर्वात मोठी मेसेज बोर्ड सिस्टम होती, जी आता 2020 वर्षाच्या अखेरीस बंद केली जात आहे.

कंपनीने आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या एका संदेशात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून याहू समूहांचा वापर सातत्याने कमी होत आहे. याच कालावधीत कंपनीच्या लक्षात आले की ग्राहकांना प्रीमियम आणि विश्वसनीय सामग्री हवी आहे. हा निर्णय घेणे आमच्यासाठी सोपे नव्हते. आता कंपनी व्यवसायाच्या इतर क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती अधिकृतपणे दिली आहे.

'अ‍ॅपल'ने लॉंच केले चार 5G स्मार्टफोन; जाणून घ्या भन्नाट फिचर्स

याहूची सेवा 2001 मध्ये सुरू करण्यात आली होती. रेडिट, गुगल ग्रूप्स आणि फेसबुकला टक्कर देऊ शकली नाही. 12 ऑक्टोबरपासून याहूवर नवीन ग्रुप्स तयार केले जात नाहीयेत आणि 15 डिसेंबरनंतर लोकांना याहू ग्रुपच्या माध्यमातून मेल पाठवता येणार नाही. वेबसाइटही उपलब्ध होणार नाही.

गुगलचे 'Gmail Go' लाइट ऍप सर्व ऍंड्रॉयड युजर्ससाठी उपलब्ध; जाणून घ्या सविस्तर

कंपनीने सांगितले की, ग्राहकांनी पाठवलेले आणि प्राप्त केलेले ईमेल्स ग्राहकांच्या ईमेलमध्येच राहतील, पण 15 डिसेंबरपासून ग्रुपच्या सदस्यांना मेल पाठवणे आणि प्राप्त करणे शक्य होणार नाही. अमेरिकेतील वायरलेस कम्युनिकेशन्स सर्व्हिस प्रोव्हायडर वेरिजोनने 2017 मध्ये याहूचा इंटरनेट व्यवसाय 4.8 अब्ज डॉलरला विकत घेतला होता.

(edited by- pramod sarawale)



from News Story Feeds https://ift.tt/3dL0LbV

Comments

clue frame