नवी दिल्ली- व्हॉट्सऍप आपल्या यूझर्सचा चॅट अनुभव अधिक चांगला करण्यासाठी नवीन फिचर घेऊन येत असते. याच संदर्भात कंपनीने लेटेस्ट बीटा अपडेट अंतर्गत दोन नवे फिचर आणले आहेत. नवीन अपडेटनुसार कंपनी जॉईन मिस्ड कॉल्स आणि फेस अनलॉक फिचर आणण्याच्या तयारीत आहे. 2.20.203.3 असं नव्या बीटा व्हर्जनचे नाव आहे.
जॉईन मिस्ड कॉल
सध्या व्हॉट्सऍप ग्रुप कॉल मिस केल्यानंतर तुम्ही तोपर्यंत जॉईन करु शकत नाही, जोपर्यंत ग्रुपचा एखादा मेंमर पुन्हा एकदा कॉलमध्ये अॅड करत नाही. नवीन अपडेट आल्याने ग्रुप कॉल मिस झाल्यानंतर यूझर आता स्वत: जॉईन होऊ शकतो. अपडेट केल्यानंतर ग्रुप कॉल मिस झाल्यानंतर यूझर स्वत: त्यात सहभागी होऊ शकतो, अट एकच आहे की कॉल सुरु असला पाहिजे. यासाठी व्हॉट्सऍप ओपन केल्यानंतर यूझरला स्क्रीनवर नोटिफिकेशन दिसेल.
भारतात 38 कोटी लोकांना कोरोना होऊन गेला; हर्ड इम्युनिटीला सुरुवात?
फेस अनलॉक
फेस अनलॉकचे स्मार्टफोन्स येत असल्याने व्हॉट्सऍपही आपल्या यूझर्संना ही सुविधा देणार आहे. कंपनी फिंगरप्रिंट लॉकला बायोमेट्रिक लॉकने रिप्लेस करण्याच्या तयारीत आहे. असे असले तरी कंपनी फिंगरप्रिंट लॉक ऑप्शन काढून टाकणार नाही. नव्या अपडेटमध्ये यूझर्संना दोन्हीपैकी एकाला निवडण्याचा पर्याय देण्यात येईल.
व्हॉट्सऍप या फिचर्सची चाचणी घेत आहे. बीटा टेस्टिंगनंतर कंपनी याचे ग्लोबल रोलआऊट करेल. पण, फेस अनलॉक सपोर्ट करणाऱ्या सर्व डिव्हाईसमध्ये हे फिचर्स असतील का, याबाबत नक्की सांगता येणार नाही.
दरम्यान, तुम्ही Whatsapp Business चे युझर्स असाल तर तुम्हाला याच्या काही सेवांचा लाभ घेण्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात. जगभरात 5 कोटींपेक्षा अधिक Whatsapp Business यूझर्स आहेत. कंपनीने pay-to-message ची घोषणा ब्लॉगद्वारे केली आहे. ब्लॉग पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय की, आम्ही Business ग्राहकांना काही सेवांसाठी चार्ज करणार आहोत. असे असले तरी व्हॉट्सऍपकडून Whatsapp Business सेवांसाठीचे दर जाहीर करण्यात आलेले नाहीत.
from News Story Feeds https://ift.tt/37HZTU8
Comments
Post a Comment