भारतीय सेनेने लाँच केले SAI मॅसेंजिग ऍप; असणार WhatsApp सारखे फिचर्स

नवी दिल्ली: 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत भारतीय सेनेने "Secure Application for the Internet (SAI)” नावाचे एक सुरक्षित मेसेजिंग एप्लिकेशन विकसित केले आहे.me SAI चे लॉंचिंगही झाले आहे. हे ऍप एंड-टू-एंड एनक्रिप्टेड Secured voice, Text आणि वीडियो कॉलिंगची सेवा देते.

सध्या हे ऍप फक्त  Android प्लॅटफॉर्मवर सपोर्ट करत आहे. सरंक्षण मंत्रालयाने याची माहिती गुरुवारी दिली. भारतीय सेनेने तयार केलेले हे ऍप WhatsApp सारखंच काम करते. त्यामध्ये युजर्सना WhatsAppमध्ये उपलब्ध असणारे फिचर्स यात असणार आहेत.

वाचा सविस्तर: 1 किलो ग्रॅम चहाची विक्री तब्बल 75 हजार रुपयांना!

सरंक्षण मंत्रालयाच्या एका पत्रकार परिषदेत सांगितले की, या ऍपमध्ये व्हाट्सअप, टेलीग्राम, SAMVAD आणि GIMS सारखीच एंड-टू-एंड इन्क्रिप्शन मॅसेजिंग प्रोटोकॉलची सुविधा आहे. SAI या ऍपमध्ये लोकल इन-हाउस सर्वर आणि कोडींगची सुरक्षाही खूपच आधुनिक आहे. 

या ऍपला CERTने ऑडिटर आणि आर्मी साइबर ग्रुपने वीटो केलं आहे. तसेच या ऍपला अजून कसं सुरक्षित आणि युजर फ्रेंडली करता येईल यावर सध्या अजून संशोधन सुरु आहे.

पूर्व IAF चीफ ने बताया- आखिर क्यों अभिनंदन की रिहाई पर बातचीत के दौरान घबराए हुए थे पाक आर्मी जनरल

भारतीय सेनेद्वारे SAI या ऍपला संपूर्ण देशभर वापरण्यात येणार आहे. याचा फायदा सुरक्षेच्या दृष्टीने मोठा आहे. अशी माहिती  सरंक्षण मंत्रालयाने दिली आहे. या ऍपच्या निर्मितीमध्ये मोठा वाटा असलेल्या कर्नल साई शंकर यांचं सरंक्षण मंत्र्यांनी कौतुक केलं आहे.

(edited by- pramod sarawale)



from News Story Feeds https://ift.tt/3mxGeL1

Comments

clue frame