Reliance Jio vs Airtel: २४९ रुपयात अनलिमिटेड कॉल आणि डेटा

नवी दिल्लीः रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज मध्ये १२९ रुपये, १४९ रुपये, १९९ रुपये रिचार्जनंतर २४९ रुपयांचा प्लान उपलब्ध आहे. एअरटेलकडे २४९ रुपयांचा प्रीपेड प्लान आहे जो जिओला टक्कर देत आहे. एअरटेल आणि जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये काय खास आहे. जाणून घ्या. वाचाः वाचाः २४९ रुपयांचा जिओ रिचार्ज पॅक जिओच्या २४९ रुपयांच्या रिचार्ज पॅकची वैधता २८ दिवस आहे. या पॅकमध्ये जिओ ग्राहकांना रोज २ जीबी डेटा मिळतो म्हणजेच एकूण ५६ जीबी डेटाचा फायदा मिळतो. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन ती 64Kbps होते. जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉल आणि नॉन जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी १ हजार मिनिट्स मिळतात. ग्राहकांना या पॅकमध्ये रोज १०० एसएमएस फ्री मिळते. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. वाचाः वाचाः २४९ रुपयांचा एअरटेल रिचार्ज पॅक २४९ रुपयांच्या एअरटेलच्या या पॅकमध्ये रोज १.५ जीबी डेटा ऑफर केला जातो. या रिचार्ज पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री मिळते. एअरटेल आणि बाकीच्या सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या रिचार्ज पॅकमध्ये एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम सब्सक्रिप्शन फ्री आहे. तसेच हेलोट्यून्स, विंक म्यूझिक आणि १ वर्षासाठी शॉ अकादमी फ्री ऑनलाइन कोर्स मिळतो. फास्टॅगवर १५० रुपयांचा कॅशबॅक मिळतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HlPQcX

Comments

clue frame