Reliance Jio चा सर्वात स्वस्त प्लान १२९ रुपयांपासून सुरू, 56GB पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड कॉल

नवी दिल्लीः रिलायन्स जिओकडे ग्राहकांना देण्यासाठी २४ दिवसांपासून १ वर्षापर्यंत वैधता असलेले प्रीपेड प्लान आहेत. सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लानची किंमत १२९ रुपये आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी रिलायन्स जिओ च्या सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लान पॅक संबंधी माहिती देत आहोत. याची किंमत २५० रुपयांच्या आतमध्ये आहे. १२९ रुपये, १४९ रुपये, १९९ रुपये आणि २४९ रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये माहिती जाणून घ्या. वाचाः १२९ रुपयांचा जिओ रिचार्ज पॅक जिओचा १२९ रुपयांचा प्रीपेड पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. या रिचार्ज पॅकमध्ये २ जीबी डेटा मिळतो. २ जीबी डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते. जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर नॉन जिओ नेटवर्कवर कॉलिंग साठी १ हजार मिनिट्स या रिचार्जमध्ये मिळते. ग्राहकांना एकूण ३०० फ्री जिओ मिनिट्स मिळतात. जिओ अॅप्सचे अॅक्सेस सुद्धा या रिचार्ज पॅकमध्ये मिळतात. वाचाः १४९ रुपयांचा जिओ रिचार्ज पॅक जिओचा १४९ रुपयांचा रिचार्ज पॅकची वैधता २४ दिवसांची आहे. ग्राहकांना या रिचार्ज प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा म्हणजेच एकूण २४ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. रोज मिळणाऱ्या डेटाची लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps होते. रोज १०० एसएमएस ग्राहकांना मिळते. तसेच जिओ अॅप्सची सुविधा या रिचार्ज पॅकमध्ये फ्री मध्ये मिळते. वाचाः १९९ रुपयांचा रिचार्ज पॅक जिओचा १९९ रुपयांचा रिचार्ज पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. या रिचार्ज प्रीपेड पॅकमध्ये जिओ ग्राहकांना रोज १.५ जीबी डेटा या प्रमाणे ४२ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर नॉन जिओ नेटवर्कवर कॉलिंग साठी १ हजार मिनिट ऑफर केले जातात. वाचाः २४९ रुपयांचा रिचार्ज पॅक जिओचा २४९ रुपयांचा रिचार्ज पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. या प्रीपेड पॅकमध्ये रोज २ जीबी डेटा या हिशोबाप्रमाणे एकूण ५६ जीबी डेटा हाय स्पीड ऑफर केला जातो. जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर नॉन जिओ नेटवर्कवर कॉलिंग साठी १ हजार मिनिट मिळते. युजर्संना रोज १०० एसएमएस फ्री पाठवता येवू शकते. जिओ अॅप्सची सुविधा फ्री मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3m8kWU3

Comments

clue frame