Realme C17 भारतात येतोय, किंमत कमी, फीचर्स जास्त

नवी दिल्लीः लवकरच भारतात एन्ट्री लेवल स्मार्टफोन सेगमेंट मध्ये जबरदस्त मोबाइल लाँच करणार आहे. याचे फीचर्स जबरदस्त आहेत. तसेच कॅमेरा क्वॉलिटी अन्य मिड रेंजच्या फोनपेक्षा चांगला आहे, असा कंपनीचा दावा आहे. रियलमीने गेल्या वर्षी हा स्मार्टफोन बांगलादेशात लाँच केला होता. वाचाः टिप्स्टर मुकुल शर्मा यांनी सांगितले की, रियलमीचा जबरदस्त फोन रियलमी सी १७ दिवाळी नंतर भारतात लाँच केला जावू शकतो. नोव्हेंबरच्या अखेर पर्यंत किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला या स्मार्टफोनला लाँच करणार आहे. वाचाः फोनची खास वैशिष्ट्ये रियलमीच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा स्क्रीन रिजॉल्यूशन 1600x720 पिक्सल आहे. यात 600 nits ची ब्राइटनेस आणि डिस्प्ले रिफ्रेश रेट 90 हार्ट्ज आहे. रियलमीच्या या फोनमध्ये क्वॉलकॉम Snapdragon 460 SoC प्रोसेसर दिला आहे. लो अँड सेगमेंटमध्ये बेस्ट चिपसेट मानला जातो. रियलमीच्या या फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा ऑप्शन सोबत लाँच करणार आहे. वाचाः ५ कॅमेऱ्याचा फोन रियलमी सी १७च्या फोनमध्ये ४ कॅमेरे आहेत. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. बांगलादेशमध्ये या फोनला १६ हजार रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dXqgXw

Comments

clue frame