भारतात आजपासून PUBG पुर्णपणे बंद; कंपनीने फेसबूकवरून दिली माहिती

नवी दिल्ली: आजपासून (30 ऑक्टोबर) पबजी मोबाईल  (PUBG Mobile) आणि पबजी मोबाईल लाईट (PUBG Mobile Lite) दोन्ही ऍप भारतात पुर्णपणे काम करणे बंद होतील. कंपनीने बुधवारी फेसबूकवर एक पोस्ट टाकून याबद्दलची माहिती दिली. यापुर्वी भारताने चीनवर डिजीटल स्ट्राईक करत चीनच्या 118 ऍपवर बंदी घातली होती. या बंदी घातलेल्या ऍपमध्ये प्रसिध्द अशा पबजी या गेमिंग ऍपचाही समावेश होता. भारताने या कारवाईचे कारण चीनकडून असणाऱ्या डिजीटल धोक्याचं कारण दिलं होतं. 

ही मोठी घोषणा अशा वेळेस झाली होती ज्यावेळेस पबजी मोबाईलने लिंकडीनवर एका पोस्टद्वारे सांगितले होते की भारतात बॅटल रॉयल-स्टाइव गेम लवकरच पुन्हा सुरु होणार आहे. पण भारतात आता पबजी गेमला प्ले स्टोर आणि एप्पल ऐप स्टोअरवरून काढून टाकलं आहे. 

Best Plans: 200 रुपयांपेक्षा कमी रुपयांचे रिचार्ज ; मिळणार 42 GB पर्यंत डेटा आणि कॉलिंग

पबजीची पॅरेंट कंपनी टेन्सेंट गेम्सने फेसबूकवर पोस्ट टाकून याबद्दल दुखः व्यक्त केलं आहे. तसेच कंपनीने पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईटच्या सर्व युजर्स आणि चाहत्यांचे आभारही मानले आहे. युजर्सची डेटा सुरक्षा आमचं प्राथमिक कर्तव्य असल्याचंही सांगितले, तसेच कंपनीने भारतात लागू असलेल्या डेटाबद्दलच्या कायद्याचं पालन केलं आहे. कंपनीच्या प्रायव्हसी पॉलिसीअंतर्गत गेमप्लेची माहिती योग्यरित्या प्रोसेस केली जात होती, अशी माहितीही कंपनीने दिली आहे.  

पबजीचे 25 टक्के युजर्स भारतातील- 
कोरोनाकाळात पबजी गेमिंग ऍपच्या वापरात मोठी वाढ झाली होती. याकाळात नवीन युजर्सची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढली होती. जगभरातील पबजीच्या युजर्सपैकी तब्बल 25 टक्के युजर्स भारतातील होते. आता पबजी भारतातून बंद झाल्याने कंपनीला खूप मोठा फटका बसला आहे.

Whatsapp ग्रुप कॉलिंगचा बदलणार अंदाज; फेस अनलॉकची ऍन्ट्री

कंपनीला झाला तोटा-
भारतात पबजीवर बंदी घालताच चीनच्या या कंपनीची मार्केट व्हॅल्यूमध्ये 34 अरब डॉलरची घट दिसून आली होती. टेन्सेंट कंपनीने पबजी गेमिंग ऍपच्या माध्यमातून सर्वाधिक पैसे कमावले होते. भारतातून प्रत्येक दिवशी या ऍपचा 3 कोटींपेक्षा जास्त लोकं वापर करत होते. पबजीच्या एक्टिव्ह युजर्सच्या बाबतीत भारत टॉपवर होता. यामुळेचा टेन्सेंट कंपनी भारतात सर्वात जास्त पैसे कमावत होती.

(edited by- pramod sarawale)



from News Story Feeds https://ift.tt/2Gaaw6T

Comments

clue frame