नवी दिल्लीः ओप्पोने भारतात आणखी एक जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. ज्यात ४ कॅमेरे आहे. तसेच 5000 mAh बॅटरी दिली आहे. या फोनची किंमत ११ हजार ९९० रुपये आहे. फेस्टिवल सीजनमध्ये ओप्पोने या नवीन स्मार्टफोनने ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. जास्त पॉवर बॅटरी सोबत फोनमध्ये जास्त कॅमेरे पसंत केले जातात. ओप्पोच्या नवीन फोनची विक्री याच महिन्यात फ्लिपकार्ट सोबत रिटेल स्टोरवर होणार आहे. वाचाः एकाच व्हेरियंटमध्ये लाँच ओप्पोने Oppo A33 (2020) ला केवळ एकाच व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. जे ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज सोबत येते. ब्लॅक कलरमध्ये लाँच केलेल्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस होल पंच डिस्प्ले दिला आहे. याची स्क्रीन रिझॉल्यूशन 720x1600 पिक्सल आहे. या फोनमध्ये octa-core Qualcomm Snapdragon 460 SoC प्रोसेसर दिला आहे. हा फोन ऑपरेटिंग सिस्टम आणि अँड्रॉयड १० वर बेस्ड आहे. ओप्पोने फोनच्या स्क्रीन सोबत बॅकला फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. वाचाः ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा ओप्पोच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात १३ मेगापिक्सल सोबत २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. जी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः लवकरच फ्लिपकार्टवर सेल सुरू होणार ओप्पोने या फोनची विक्री सुरू केली आहे. फ्लिपकार्टवर याची ऑनलाइन विक्री सुरू करण्यात येईल. ओप्पोच्या या फोनवर कोटक बँक, आरबीएल बँक, फेडरल बँक, बँक ऑफ बडोदाच्या कार्डवरून खरेदी केल्यास ५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31visax
Comments
Post a Comment