OnePlus चा स्वस्त फोन Nord N100 लाँच, किंमत २० हजारांपेक्षा कमी

नवी दिल्लीः प्रीमियम स्मार्टफोन बनवणारी चीनची कंपनी वनप्लसने सर्वात स्वस्त फोन लाँच करण्यात आला आहे. यासोबतच कंपनीने सर्वात स्वस्त किंमतीत ५जी फोन सुद्धा लाँच केला आहे. वनप्ल नॉर्ड एन १०० ला केवळ २३३ डॉलर म्हणजेच १७ हजार २३० रुपयांच्या किंमतीत आणि वनप्लस नॉर्ड एन १० ५ जीला ४२९ डॉलर म्हणजेच ३१ हजार ७१४ रुपयांत लाँच केले आहे. वनप्लस नॉर्ड एन १०० एन्ट्री लेवल स्मार्टफोन आहे. तर नॉर्ड एन १० ५जी सर्वात स्वस्त ५ जी फोन आहे. वाचाः कमी किंमतीत खूप सारे आकर्षक फीचर सोबत अमेरिकेत लाँच करण्यात आलेल्या फोन्स लवकरच भारतात लाँच करण्यात येतील. भारतात वनप्लसच्या या दोन्ही फोन्सच्या किंमतीत फारसा बदल होण्याची शक्यता नाही. वाचाः OnePlus Nord N10 5G ची खास वैशिष्ट्ये या फोनध्ये ६.४९ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. यात स्नॅपड्रॅगन ६९० प्रोसेसर दिला आहे. या फोनला ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज सोबत लाँच करण्यात आले आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी यात 4,300mAh ची बॅटरी दिली आहे. ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत ८ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसरचे ४ कॅमेरे दिले आहेत. या फोनची अमेरिका आणि यूरोपमध्ये विक्री सुरू करण्यात आली आहे. वाचाः OnePlus Nord N100 चे खास फीचर्स वनप्लसच्या या एन्ट्री लेवल बजेट स्मार्टफोनमध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस स्क्रीनच्या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४० एसओसी प्रोसेसर दिला आहे. हा फोन ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सोबत १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HtkGQV

Comments

clue frame