Nokia 225 आणि Nokia 215 भारतात लाँच, पाहा 4G फीचर फोन्सची किंमत

नवी दिल्लीः HMD Global ने भारतात आले दोन नवीन 4G फीचर फोन लाँच केले आहेत. आणि 4जी कनेक्टिविटी सोबत येतात. म्हणजेच या दोन्ही नोकिया फोन्समध्ये VoLTE नेटवर्कवर कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. नोकिया २१५ आणि नोकिया २२५ ग्लॉसी फिनिशिंग आणि हार्ड कोटिंग देण्यात आले आहे. या फीचर फोन्सला कमी किमतीत मल्टी गेमिंग सोबत आणले आहे. वाचाः नोकिया २१५ आणि नोकिया २२५ मध्ये ४ जी कनेक्टिविटीसाठी VoLTE कॉल क्वॉलिटी, वेब ब्राऊजिंग, मल्टिप्लेयर गेमिंग आणि सोशल मीडियाची मजा घेता येवू शकणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नोकियाच्या या फोनमध्ये सुविधाजनक नेव्हिगेशन साठी सॉफ्ट टच कीमॅट, मोठे बटन, ईजी-ग्रिप आणि कर्व्ड बॅक दिले आहेत. वाचाः Nokia 215 आणि Nokia 225 ची किंमत नोकिया २१५ स्यान ग्रीन आणि ब्लॅक कलरमध्ये येतो. हा २३ ऑक्टोबर पासून फ्लिपकार्ट आणि नोकिया स्टोरवर ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. तर ऑफलाइन रिटेल स्टोर वरून ६ नोव्हेंबर पासून खरेदी करता येवू शकतो. या फोनची किंमत २९४९ रुपये आहे. वाचाः नोकिया २२५ क्लासिक ब्लू आणि मेटेलिक सँड व ब्लॅक कलरमध्ये येतो. हा फोन फ्लिपकार्ट आणि नोकिया स्टोरवर २३ ऑक्टोबर पासून मिळणार आहे. ६ नोव्हेंबर पासून देशभरातील रिटेल आउटलेट खरेदी करू शकाल. या फोनची किंमत ३४९९ रुपये आहे. वाचाः नोकिया २२५ ला पॉवर देण्यासाठी 1150mAh बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्ज झाल्यानंतर हा फोन पूर्ण दिवसभर चालतो. नोकिया २२५ मध्ये वायरलेस एफएफ रेडियो आहे. या फोनमध्ये रियर कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये क्रॉसी रोड आणि रेसिंग अॅटक यासारखे गेम दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kdN4o4

Comments

clue frame