Motorola चे स्मार्टफोन ४० हजारांपर्यंत स्वस्त, इंस्टेंट डिस्काउंटही मिळणार

नवी दिल्लीः फेस्टिव सीजनमध्ये आपल्याला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर मोटोरोलाची खास ऑफर आहे. २९ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये मोटोरोलाचे जबरदस्त स्मार्टफोन्सवर ४० हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. या सेलमध्ये फ्लॅट डिस्काउंट शिवाय मोटोरोलाचे पसंतीचे आकर्षक बँक ऑफर सुद्धा मिळणार आहे. अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड पेमेंटवर १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. वाचाः मोटोरोला रेजर फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेलमध्ये मोटोरोलाचा हा फोन ४० हजार रुपयांच्या सूट सोबत खरेदी करता येवू शकतो. या सूटनंतर या फोनची किंमत १ लाख २४ हजार ९९९ रुपयांऐवजी ८४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. फोनमध्ये ६.२ इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले मिळतो. नोटिफिकेशन्स चेक करण्यासाठी यात २.७ इंचाचा क्विक व्ह्यू डिस्प्ले दिला आहे. वाचाः बिग दिवाळी सेलमध्ये मोटोरोलाच्या या प्रीमियम स्मार्टफोनला तुम्ही ७४ हजार ९९९ रुपयाऐवजी ६४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन असलेल्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः मोटो ई७ प्लस मोटोरोलाचा हा प्रसिद्ध बजेट स्मार्टफोन आहे. या सेलमध्ये ९ हजार ४९९ रुपये किंमत असलेला हा फोन सूटनंतर ८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः मोटो जी ९ या सेलमध्ये ९९९९ रुपयात फोन खरेदी करता येवू शकतो. या फोनची किंमत ११ हजार ४९९ रुपये आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ६६२ स्नॅपड्रॅगन प्रोसेसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. २० वॉटची टर्बोपॉवर चार्जर दिले आहे. वाचाः मोटो वन फ्यूजन प्लस या फोनवर १ हजार रुपयांची सूट दिली जाणार आहे. या फोनची किंमत १७ हजार ४९९ रुपयांऐवजी १६ हजार ४९९ रुपये किंमत झाली आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3e3FCcP

Comments

clue frame