Lenovo K12 Note चा फोटो झाला लीक, समोर आले लूक आणि फीचर्स

नवी दिल्लीः स्मार्टफोन मेकर कंपनी Lenovo लवकरच K Note सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. गेल्या वर्षी कंपनीने Lenovo K10 Note स्मार्टफोन लाँच केला होता. यावर्षी कंपनी फोन आणू शकते. नवीन स्मार्टफोनचे काही रेंडर फोटो समोर आले आहेत. रिपोर्टच्या माहितीनुसार, Moto G9 Play स्मार्टफोन चा रिब्रँडेड व्हर्जन असणार आहे. वाचाः फोनचा फोटो एक ट्विटर युजर (@Sudhanshu1414) ने पोस्ट केला आहे. ज्यात स्मार्टफोनला फ्रंट, रियर आणि साईड वरून पाहता येवू शकते. लूक मध्ये सर्वात मोठे अंतर लोगो आणि याची प्लेसमेंट आहे. मोटो जी ९ मध्ये रियरमध्ये फिंगरप्रिंटच्या वर मोटोरोलाचा लोगो बनवला होता. नवीन डिव्हाईसमध्ये नवीन लेनोवा चा लोगो खालच्या बाजुला दिला आहे. वाचाः फोटोवरून स्मार्टफोन ग्रीन आणि ब्लू कलरमध्ये येणार आहे. कंपनी स्मार्टफोनला भारतात Moto G9 आणि अन्य देशात Moto G9 Play नावाने विक्री करणार आहे. टिप्स्टरच्या माहितीनुसार, या फोनच्या वैशिष्ट्यांत सर्वात मोठा बदल चार्जिंग स्पीडमध्ये असणार आहे. लेनोवाच्या १२ नोटमध्ये १५ वॉट फास्ट चार्जिंग मिळणार आहे. तर मोटरोलामध्ये २० वॉट फास्ट चार्जिंग दिली होती. वाचाः आतापर्यंत फोनचे वैशिष्ट्ये समोर आले नाहीत. परंतु, स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर, 5000mAh ची बॅटरी आणि फोटोग्राफीसाठी यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35JMTuR

Comments

clue frame