नवी दिल्ली - सध्या सोशल मीडियावर आयफोन आणि अँड्रॉइड यांच्यात बेस्ट फोन कोणता हे दाखवणारा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. अँड्रॉइड फोन किंमतीने स्वस्त असल्यानं तो खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तरीही आयफोनच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. सुरक्षेच्या आणि क्वालिटीच्या दृष्टीने आयफोन सरस ठरतो. यावरूनच दोन्हीपैकी बेस्ट कोणता हे दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
अॅपलने तयार केलेल्या आयफोनला तंत्रज्ञानाच्या दृष्टीने चांगला आणि कॅमेऱ्यासाठीही सर्वात चांगला मानलं जातं. तर अँड्रॉइड युजर्स मात्र आयफोन स्लो असल्याचा दावा करतात. ते करत असताना अँड्रॉइड फोनचे फायदेही सांगतात. यात सर्वात पहिल्यांदा सांगितली जाणारी गोष्ट म्हणजे अँड्रॉइड फोन कमी खर्चात आणि अनेक प्रकारची फीचर्स देते. तसंच युजरला वापरताना कमी अडचणी येत असल्याचा दावा केला आहे.
हे वाचा - Best Plans: 200 रुपयांपेक्षा कमी रुपयांचे रिचार्ज ; मिळणार 42 GB पर्यंत डेटा आणि कॉलिंग
ट्विटरवर असाच दोन्ही फोनची तुलना करणारा व्हिडिओ शेअर केला जात आहे. यामध्ये एका युजरनं आयफोन आणि अँड्रॉइडमध्ये कोणता फोन वेगाने काम करतो ते दाखवलं आहे. टिकटॉकसाठी तयार करण्यात आलेला हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. यामध्ये आयफोन आणि अँड्रॉइड एकत्र ठेवण्यात आले आहेत. युजर दोन्ही फोनच्या स्क्रीनवर एकाच वेळी टच करून कोणत्या फोनवर पहिल्यांदा अॅप्लिकेशन्स ओपन होतात हे दाखवतो.
Androids will forever be superior pic.twitter.com/osENs3JfbU
— aly (@rareprixt) October 19, 2020
व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरने अँड्रॉइड नेहमीच चांगला असेल असं म्हटलं आहे. अर्थात यावर आयफोन युजर्सनी दोन्ही फोनमधील तुलनात्मक फरक सांगितला आहे. दोन्हीमधील बेस्ट कोणता यावरून वाद असला तरी व्हिडीओ मात्र चांगलाच गाजत आहे.
from News Story Feeds https://ift.tt/2HmOZZl
Comments
Post a Comment