Infinix Smart 4 Plus स्मार्टफोनला स्वस्तात खरेदीची संधी

नवी दिल्लीः कंपनीचा बजेट स्मार्टफोन आहे. हा फोन पुन्हा एकदा मध्ये सूट सोबत विकला जाणार आहे. इनफिनिक्सच्या या फोनला फ्लिपकार्ट सेलमध्ये १ हजार रुपयांची सूट आणि दुसऱ्या ऑफर्स सोबत घेण्याची संधी मिळणार आहे. इनफिनिक्स स्मार्ट ४ प्लस मध्ये ३२ जीबी स्टोरेज आणि ३ जीब रॅम आहे. वाचाः Infinix Smart 4 Plus ची किंमत या फोनला फ्लिपकार्टवर प्रत्येक आठवड्याला फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध करून दिले जाते. फ्लिपकार्ट दिवळी सेलमध्ये फोनला ७ हजार ९९९ रुपयांऐवजी ६ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड व ईएमआय ट्रान्झॅक्शन द्वारे १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. फोनवर ६ हजार ४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळणार आहे. ५८४ रुपये प्रत्येक महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआयवर हँडसेट खरेदी करता येवू शकतो. फोन मिडनाइट ब्लॅक, ओशन वेव स्यान आणि वॉयलेट कलरमध्ये येतो. वाचाः फोनचे खास वैशिष्ट्ये इनफिनिक्स स्मार्ट ४ प्लस मध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. हँडसेटमध्ये ६.८२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो ए २५ प्रोसेसर दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि एक डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh बॅटरी दिली आहे. फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम सोबत येतो. कनेक्टिविटी साठी फोनमध्ये 4जी वीओएलटीई, ब्लूटूथ, जीपीएस/जीपीआरएस, वाय-फाय यासारखे फीचर्स दिले आहेत. तसेच फिंगरप्रिंट, एम्बियंट लाइट, जी-सेंसर, प्रॉक्सिमिटी, जायरोस्कोप आणि ई-कंपास दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ms4w8X

Comments

clue frame