नवी दिल्लीः बीएसएनएल कंपनीने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देत आहे. बीएसएनएल मध्ये अनेक प्रिपेड व्हाऊचर्स (PVs) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (STVs) वरची वैधता वाढवली आहे. त्यामुळे युजर्सला मोठ्या वेळासाठी रिचार्जवर मिळणारी सुविधाचा लाभ घेता येवू शकणार आहे. बीएसएनएलने १९९९ रुपये , ६९९ रुपये, २४७ रुपये आणि १४७ रुपयांच्या प्रीपेड व्हाउचर्स आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्सवरची वैधता वाढवली आहे. १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत बीएसएनएलच्या प्रीपेड आणि टॅरिफ रिचार्ज प्लानचा फायदा घेता येवू शकतो. वाचाः कोणत्या रिचार्जवर किती फायदा ग्राहक आता ३० नोव्हेंबर पर्यंत बीएसएनएलचा १९९९ रुपयांचा प्रीपेड प्लान घेत असतील तर त्यांना ३६५ दिवसांऐवजी आता ४२४ दिवसांची वैधता मिळणार आहे. म्हणजेच दोन महिने अतिरिक्त. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड व्हाइस कॉल सोबत ३ जीबी दररोज इंटरनेट मिळणार आहे. तसेच यासोबत अन्य अनेक लाभ युजर्संना मिळू शकणार आहे. ज्यात २ महिन्याचा इरोस नाउ सब्सक्रिप्शन आणि बीएसएनएल ट्यून्स आहे. ६९९ आणि २४७ च्या रिचार्जवर हे लाभ बीएसएनएलच्या प्रोमोशनल ऑफर अंतर्गत तुम्हाला ६९९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज केल्यास तुम्हाला १६० दिवसांच्या ऐवजी १८० दिवसांची वैधता मिळते. यात रोज ०.५ जीबी डेटा सोबत रोज १०० एसएमएस आणि ६० दिवसांसाठी फ्री बीएसएनएल ट्यून्सचा लाभ मिळणार आहे. २४७ रुपयांच्या रिचार्जवर आता बीएसएनएल युजरला ३० दिवसांच्या ऐवजी ४० दिवसांची वैधता मिळणार आहे. तसेच अनलिमिटेड व्हाइस कॉल सोबत इंटरनेट युज करण्यासाठी रोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. यासोबत रोज १०० एसएमएस आणि एक महिन्यांसाठी एरोस नाउ चे सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे. वाचाः १४७ रुपयांच्या रिचार्जवर हे फायदे बीएसएनएलच्या प्रोमोशनल ऑफर दरम्यान जर तुम्ही १४७ रुपयांचे रिचार्ज करीत असाल तर तुम्हाला ३५ दिवसाची वैधता मिळणार आहे. यात १० जीबी डेटा आणि ३० दिवसांसाठी बीएसएनएल ट्यून्सची सुविधा फ्री मिळणार आहे. तसेच बीएसएनएलने ६० रुपयांच्या टॉपअपवर फुल टॉकटाइमची घोषणा केली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HdSOQF
Comments
Post a Comment