खरेदी केला ७ हजारांचा स्मार्टफोन, मिळाला १४ रुपयांचा रिन साबण

नवी दिल्लीः अॅमेझॉन सेलमध्ये लाखो लोकांनी कमी किंमतीत स्मार्टफोन्स, टीव्ही, कपड्यांसह अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स खरेदी केले. परंतु, दिल्लीच्या एका व्यक्तीला अॅमेझॉन सेलमध्ये नवा फोन खरेदी करणे महागात पडले आहे. दिल्लीच्या नमन वैशने अॅमेझॉन फेस्टिवल सेलमध्ये शाओमीचा प्रसिद्ध स्मार्टफोन खरेदी केला होता. परंतु, फोनच्या बदल्यात मोबाइलच्या डब्यात कपडे धोन्याचा मिळाला आहे. वाचाः 91mobiles च्या रिपोर्टनुसार, दिल्लीच्या नमन वैशने १७ ऑक्टोबर रोजी अॅमेझॉन सेलमध्ये आपला मनपसंत फोन रेडमी८ए ऑर्डर केला होता. गेल्या रविवारी सामान घरी पोहोचले. परंतू, डब्बा उघडला तर त्यांना धक्काच बसला. ७ हजार रुपयांचा फोन ऐवजी बॉक्समध्ये १४ रुपयांचा साबण होता. नमनने याचा फोटो ट्विट करीत सोशल मीडियावर अॅमेझॉनला टॅग केले आहे. तसेच म्हटले की, ग्राहकांचा असा विश्वास तोडू नका. अॅमेझॉनने तात्काळ याला रिप्लाय देत म्हटले की या प्रकरणाचा तपास करून नमनला ४ ते ५ दिवसात फोन दिला जाईल. या घटनेला सेलर जबाबदार आहे. तसेच या घटनेबद्दल आपल्या दुःख झाल्याचे अॅमेझॉनने म्हटले आहे. वाचाः अॅमेझॉन सेल असो की अन्य ई कॉमर्स कंपन्यांचा सेल मध्ये अनेकदा ग्राहकांना असा सामना करावा लागला आहे. भाव्या शर्मा नावाच्या एका ग्राहकाने यूट्यूब व्हिडिओवरून सांगितले होते की, फ्लिपकार्टवरून ८० हजार रुपयांचा आयफोन ११ प्रो ऑर्डर केला होता. परंतु, यावेळी ओरिजनल फोन ऐवजी क्लोन म्हणजे बनावट फोन पाठवला होता. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3otb2OJ

Comments

clue frame