जिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे

नवी दिल्लीः रिलायन्स जिओने वेगवेगळ्या कॅटेगरीत अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान युजर्ससाठी उपलब्ध केले आहेत. आज आम्ही तुम्हाला जवळपास एकाच किंमतीत असलेले रिलायन्स जिओचे दोन प्रीपेड रिचार्ज प्लान संबंधी माहिती देत आहोत. रोज २ जीबी डेटा ऑफर मिळणाऱ्या या प्लानमध्ये ५९८ रुपये आणि ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना काय-काय वेगळे बेनिफिट्स मिळतात, जाणून घ्या. वाचाः ५९८ रुपयांचा जिओचा प्लान जिओच्या या ५९८ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये २ जीबी डेटा रोज मिळतो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ११२ जीबी हाय स्पीड डेटाचा फायदा मिळतो. रोज मिळणाऱ्या डेटाची लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होवून ती 64Kbps होते. वाचाः या प्लानमध्ये जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड आणि नॉन जिओ नेटवर्कवर २ हजार एफयूपी मिनिट्स मिळतात. ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री मिळते. याशिवाय, जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन या पॅकमध्ये फ्री मिळते. जिओच्या या प्लानमध्ये विना कोणतेही अतिरिक्त शूल्क न देता एक वर्षापर्यंत डिज्नी प्लस हॉटस्टार सब्सक्रिप्शन फ्री मिळते. वाचाः ५९९ रुपयांचा जिओ प्लान ५९९ रुपयांच्या जिओच्या या पॅकची वैधता ८४ दिवसांची आहे. रोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहकांना एकूण १६८ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. रोज मिळणाऱ्या या डेटाची लिमिट संपल्यानंतर डेटा स्पीड कमी होवून ती 64Kbps होते. जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी अनलिमिटेड आणि नॉन जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३ हजार मिनिट्स मिळतात. ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री मिळते. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन या रिचार्ज पॅकमध्ये फ्री मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mHrvNJ

Comments

clue frame