नवी दिल्ली- फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्ऍप वापरण्यासाठी यापुढे यूझर्संना पैसे द्यावे लागू शकतात. कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टवर यासंबंधीची माहिती दिली आहे. जगभरात व्हॉट्ऍपचे करोडो यूझर्स आहेत. व्हॉट्ऍप हे प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. पण, चांगली बातमी ही आहे की, व्हॉट्ऍप सर्व यूझर्संना नाही तर केवळ Whatsapp Business यूझर्संना यासाठी चार्ज करणार आहे.
तुम्ही Whatsapp Business चे युझर्स असाल तर तुम्हाला याच्या काही सेवांचा लाभ घेण्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात. जगभरात 5 कोटींपेक्षा अधिक Whatsapp Business यूझर्स आहेत. कंपनीने pay-to-message ची घोषणा ब्लॉगद्वारे केली आहे. ब्लॉग पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय की, आम्ही Business ग्राहकांना काही सेवांसाठी चार्च करणार आहोत. असे असले तरी व्हॉट्सऍपकडून Whatsapp Business सेवांसाठीचे दर जाहीर करण्यात आलेले नाहीत.
Mann Ki Baat: व्होकल फॉर लोकल, सैनिकांसाठी दिवा...जाणून घ्या काय म्हणाले PM मोदी
व्हॉट्सऍपमध्ये दिसणार जाहिरात
व्हॉट्सऍपचं म्हणणं आहे की, Business यूझर्संना चार्च केल्याने ते अधिक चांगली सेवा देऊ शकतील. यूझर्संना फ्री एंड-टू-एंड एनक्रिप्टेड टेक्स्ट, व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलिंग देता येईल. दरम्यान, व्हॉट्ऍपच्या सर्वसाधारण यूझर्संना या ऍपच्या वापरासाठी कोणतेही बदल करण्यात आलेली नाहीत. यूझर्स पूर्वीप्रमाणे मेसेजिंग करु शकतील. असे असले तरी येत्या काही दिवसात कंपनी ऍपवर काही जाहिराती दाखऊ शकते. कंपनी यावर गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. ऍपच्या Status सेक्शनमध्ये यूझर्संना जाहिरात पाहायला मिळू शकते.
from News Story Feeds https://ift.tt/3mhFJ7C
Comments
Post a Comment