ऑनलाइन फेस्टिव सेलमध्ये बनला नवा रेकॉर्ड, प्रत्येक मिनिटाला १.५ कोटींच्या फोनची विक्री

नवी दिल्लीः देशात फेस्टिव सेल दरम्यात ७ दिवस (१५ ते २१ ऑक्टोबर) या दरम्यान पुन्हा एकदा स्मार्टफोन्सने बाजी मारली आहे. शॉपिंग कॅटेगरीत सर्वात जास्त स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. एकूण फेस्टिव सेलचे ४७ टक्के शेयर मिळवले आहे. याचे सर्व श्रेय नवीन लाँच आणि स्वस्त किंमतीतील स्मार्टफोन्स मॉडल आहे. वाचाः बेंगळुरूच्या मार्केट रिसर्च फर्म RedSeerच्या माहितीनुसार, फेस्टिव सेलच्या आधीच्या आठवड्यात ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रत्येक मिनिटाला १.५ कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची विक्री झाली आहे. याचे कारण म्हणजे व्हॅल्यू सिलेक्शन आणि अफोर्डेबिलिटी स्कीम आणि फास्ट डिलिवरी आहे. RedSeer Consulting चे डायरेक्टर यांनी सांगितले की, अनेक कारणामुळे भारतीय ई-कॉमर्ससाठी #FestivalofFirsts आहे. याची फ्यूचर ग्रोथ आणखी मजबूत बनवता येणार आहे. वाचाः गेल्या वर्षी फेस्टिव सेलमध्ये फॅशनचे खूप मोठे योगदान राहिले नव्हते. परंतु, यावर्षी फॅशनचा १४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर फॉर्मल आणि फेस्टिव वियरची मागणी अद्यापही कमी आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की, होम आणि होम फर्निशिंग यासारख्या कॅटगरीजच्या मागणीत वर्क फ्रॉम होम आणि स्टडी फ्रॉम होम इन्फ्रास्टक्चर असल्याने यात खूप मोठी वाढ पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात कंपनीने Mi India ने माहिती दिली होती. वाचाः कंपनीने अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि mi.com प्लॅटफ्रॉमवर ७ दिवसांत फेस्टिव सेल दरम्यान ५० लाख हँडसेट्सची विक्री झाली आहे. चीनी स्मार्टफोन ब्रँड पोकोने फ्लिपकार्टवर फेस्टिव सेलमध्ये १० लाखांहून जास्त स्मार्टफोन्सची विक्री केली आहे. प्रीमियम सेगमेंटमध्ये स्मार्टफोन्सने ३.२ पट अधिक वाढीची नोंद केली आहे. यात अॅपल, गुगल आणि सॅमसंगचा मोठा सहभाग आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ovkMbj

Comments

clue frame