चिनी कम करा म्हणत मायक्रोमॅक्स ३ नोव्हेंबरला नवे स्मार्टफोन लाँच करणार

नवी दिल्लीः भारतीय टेक ब्रँड मायक्रोमॅक्सकडून कंपनीची नवीन स्मार्टफोन सीरीजच्या लाँचची घोषणा करण्यात आली आहे. 'in' सीरीजच्या स्मार्टफोन्सला कंपनी ३ नोव्हेंबर रोजी भारतात लाँच करणार आहे. आतापर्यंत समोर आले नाही की, कंपनी या दिवशी किती स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. जवळपास दोन वर्षानंतर इंडियन मार्केटमध्ये कमबॅक करण्याची तयारी करीत आहे. हे नवीन डिव्हाईस बजेट आणि मिडरेंज सेगमेंटमध्ये येवू शकतात. वाचाः मायक्रोमॅक्सच्या नवीन स्मार्टफोन्सच्या टीझर मध्ये कंपनीकडून टॅगलाईन देण्यात आली आहे, 'आओ करें, चीनी कम' शेयर केली जात आहे. या प्रमाणे कंपनी थेट चायनीज स्मार्टफोन कंपन्या आणि चायनीज स्मार्टफोनवर अटॅक करीत नवीन फोन घेवून येत आहे. मायक्रोमॅक्सने याआधी चायनीज डिव्हाईसेजला रिब्रँड करून भारतात विकलेले आहे. परंतु, नवीन सीरीज ही पूर्णपणे मेड इन इंडिया असल्याचा दावा करीत आहेत. कंपनी अँटी चायना लाट विरोधाचा पूर्ण लाभ घेण्याच्या तयारीत आहे. वाचाः समोर आले खास वैशिष्ट्ये एका रिपोर्टमध्ये Micromax In स्मार्टफोन्सचे डिटेल्स समोर आले आहेत. एक मायक्रोमॅक्स फोन कंपनी MediaTek Helio G35 प्रोसेसर सोबत आणू शकते. तसेच दोन व्हेरियंट 2GB+32GB आणि 3GB+32GB मध्ये मार्केटमध्ये उतरवले जावू शकते. या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले मिळू शकतो. तसेच नवीन डिव्हाईसेज बजेट सेगमेंटमध्ये 5000mAh बॅटरी मिळू शकते. वाचाः इतकी असू शकते किंमत Micromax In सीरीज च्या डिव्हाईसेजच्या बेस व्हेरियंट ड्यूल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला जावू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. 3GB रॅम मॉडल ट्रिपल कॅमेरा 13+5+2 मेगापिक्सल ऑफर केला जावू शकतो. सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या फोनची किंमत ७ हजारते १५ हजार रुपयांदरम्यान असू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3miSiiW

Comments

clue frame