व्हॉट्‌स ऍप ग्रुप व्हिडिओ कॉलिंग : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी एक मोफत व उपयुक्त पर्याय !

आज झूम, गूगल मीट यांसारखे कॉन्फरन्ससाठी वापरले जाणारे अनेक ऍप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. एकाच वेळेस अनेकांशी संवाद साधणं यामध्ये शक्‍य होतं. याच्या जोडीला व्हॉट्‌स ऍपनेही कॉन्फरन्ससाठी "ग्रुप व्हिडिओ कॉलिंग'चं नवीन फीचर आणलं आहे. आज व्हॉट्‌स ऍपच्या एखाद्या ग्रुपमधील जास्तीत जास्त आठ जणांना एकाच वेळेस व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधता येतो. 

शिक्षणामध्ये तर व्हाट्‌स×ऍप व्हिडिओ ग्रुप कॉलिंगचा खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग करता येऊ शकतो. याचं कारण असं, की अनेकांना झूम, गूगल मीट यांसारखे ऍप्लिकेशन्स वापरण्याची सवय असते; पण त्यातले अनेक फीचर्स त्यांना लक्षात येत नाहीत. व्हॉट्‌स×ऍपमधील ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी याला ना यूजर आयडीची गरज आहे, ना कुठला पासवर्ड वापरण्याची गरज. त्यामुळं या माध्यमातून कॉन्फरन्ससाठी सर्व पालक व विद्यार्थ्यांना एकमेकांशी शिक्षकांसोबत संवाद साधणं सोयीचं होतं. 

तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक कार्य, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, कथाकथन, व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप, एखाद्या गोष्टीच्या बाबतीत विद्यार्थ्याचे, पालकाचे मत समजून घेण्याबरोबरच पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी देखील व्हॉट्‌स×ऍप ग्रुप व्हिडिओ कॉलिंग उपयुक्त ठरतं. त्याचबरोबर झूम मीटिंगच्या बाबतीत सेक्‍युरिटीच्या संदर्भात ज्या तक्रारी मागे घडल्या त्या पाहता व्हॉट्‌स×ऍप ग्रुप व्हिडिओ कॉलिंग जास्त सोयीचं आहे असंच म्हणता येईल. 

व्हॉट्‌स×ऍप ग्रुप व्हिडिओ कॉल करताना आपल्याला ज्यांच्याशी बोलायचं आहे अशा ग्रुपमधील जास्तीत जास्त आठ मेंबर्सला सिलेक्‍ट करून ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करता सहभागी करता येतं. याबाबतीत अट फक्त एकच, की या कॉन्फरन्समध्ये सहभागी असलेल्या सर्वांचं इंटरनेट कनेक्‍शन हे स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वांना एकमेकांशी अगदी व्यवस्थित संवाद साधता येऊ शकतो. 

ज्यांना कोणतीही स्क्रीन शेअर करायची नाहीये, परंतु सहभाग घ्यायचा आहे, तसंच प्रत्यक्ष एकमेकांशी आपण बोलतोय असा अनुभव घ्यायचा आहे अशांना व्हॉट्‌स×ऍप ग्रुप व्हिडिओ कॉलिंग एक चांगला पर्याय म्हणून समोर येतो आहे. आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया शिक्षणातील तंत्रज्ञान यासंदर्भात एक नवीन विषय घेऊन. 

- राजकिरण चव्हाण
राज्य तंत्रस्नेही शिक्षक तथा जिल्हा समन्वयक, सर फाउंडेशन, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 



from News Story Feeds https://ift.tt/2IYzirR

Comments

clue frame