नवी दिल्लीः अँड्रॉयड युजर्ससाठी प्ले स्टोरवर लाखो अॅप्स आहेत. त्यातील आवश्यक असेल तर ते डाउनलोड करू शकतात. परंतु, युजर्संना आता एक इशारा दिला आहे. काही अॅप्स डाउनलोड करण्यासारखे नाहीत. ते तुम्ही चुकूनही डाउनलोड करू नका. गुगल प्ले स्टोरवर अशा १९ अॅप्सची माहिती समोर आली आहे. जे युजर्संना नुकसान पोहोचवण्यासाठी आले आहेत. त्यामुळे हे अॅप्स पाहा आणि चुकूनही डाउनलोड करू नका. वाचाः अँटी व्हायरस कंपनी Avast च्या सिक्यॉरिटी टीमकडून हा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यात सांगितले की, गुगलच्या अधिकृत प्ले स्टोरवर अनेक अॅप्सची माहिती उघड झाली आहे. जे युजर्संच्या फोनमध्ये खूप सारे ऐडवेयर इन्स्टॉर करतात. अँड्रॉयड युजर्संना लक्ष्य करतात. अशा एकूण २१ ऐडवेयर पॅक्ड अॅप्सची माहिती उघड झाली आहे. यातील तीन अॅप्सला गुगलने हटवले आहे. परंतु, अवास्टच्याय माहितीनुसार, अजूनही १९ अॅप्सची तपासणी सुरू आहे. सध्या हे अॅप्स युजर्ससाठी प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत. वाचाः वाचाः फोनमध्ये दिसू लागतात जाहिराती अनेक अॅप्स हे फन गेम्स आहेत. जसे कार रेसिंग पासून हेलिकॉप्टर ते क्रिमिनलला शूट करणे किंवा व्हर्च्यूअल कपडे उतरवणे यासारखे ऑप्शन देते. समोर आलेले असे अॅप्स प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत याला ८० लाखांहून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. एकदा हे अॅप्स डाउनलोड झाल्यानंतर HiddenAds Trojan ओरिजनल अॅप बंद झाल्यानंतर खूप साऱ्या जाहिराती दिसू लागतात. हा जाहिराती नोटिफिकेशन्स ते फुल स्क्रीन पर्यंत असू शकतात. या अॅप्सला करू नका डाउनलोड धोकादायक अॅप्स डाउनलोड नंतर आयकॉन लपवतात. त्यामुळे हे सहज डिलीट होत नाहीत. अवास्टच्या थ्रेट एनालिस्ट जाकूब वार्वा यांनी या अॅप्ससंबंधी सोशल मीडिया, मेसेजिंग अॅप्स आणि यूट्यूबवर खूप प्रमोट केले जात आहे. यातील अनेक अॅप्स युजर्सचा डेटा चोरी करतात. तसेच थर्ड पार्टीला पाठवण्याचे काम करतात. त्यामुळे असे अॅप्स चुकूनही डाउनलोड करू नका. पाहा खाली दिलेली यादी - Shoot Them - - - - Assassin Legend - 2020 NEW - Helicopter Shoot - Rugby Pass - Flying Skateboard - Iron it - Shooting Run - Plant Monster - Find Hidden - Find 5 Differences - Rotate Shape - Jump Jump - Find the Differences - Puzzle Game - Sway Man - Desert Against - Money Destroyer - Cream Trip वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Hy7UQu
Comments
Post a Comment