दोन दिवस बॅटरी लाईफचा नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीः HMD ग्लोबल ने नवीन Nokia 2 V Tella लाँच केला आहे. हा कंपनीचा नोकिया २ व्हीचे अपडेट मॉडल आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे. ज्यात ड्यूल रियर कॅमेरा, स्लीम बेजल्स आणि दोन दिवसांची बॅटरी लाइफ यासारखे खास वैशिष्ट्ये आहेत. फोनमध्ये गुगल असिस्टेंट साठी बटन दिले आहे. कंपनीने फोनला सध्या यूएसमधील बाजारात उतरवले आहे. याची विक्री एक्सक्लूसिव्ह म्हणून Verizon वर केली जाणार आहे. वाचाः फोनची किंमत हा स्मार्टफोन एकाच कलर ऑप्शनमध्ये आणि एकाच रॅम प्लस स्टोरेज ऑप्शन मध्ये आणला आहे. अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणाऱ्या या फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस १६ जीबी स्टोरेज दिला आहे. फोनची किंमत १६८ डॉलर म्हणजेच १२ हजार ४०० रुपये किंमत आहे. फोन ब्लू कलर मध्ये येतो. वाचाः Nokia 2 V Tella चे खास फीचर्स हा एक सिंगल सिम स्मार्टफोन आहे. फोनमध्ये ५.४५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम आणि मीडियाटेक हीलियो ए २२ प्रोसेसर मिळतो. फोनमध्ये १६ जीबी स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये दोन रियर कॅमेरे आणि सिंगल फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेऱ्यात ८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात 3,000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2FN07Ol

Comments

clue frame