क्रोमा इफेक्‍ट : व्हिडिओला अधिक आकर्षक व परिणामकारक करण्याचं माध्यम 

रोजच्या अध्यापनामध्ये शैक्षणिक व्हिडिओला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसं एक चित्र हजार शब्दांचं काम करतं, तसंच एक व्हिडिओ हा लाखो शब्दांचं काम करतो. अनेक किचकट संकल्पना समजावून सांगताना व्हिडिओचा उपयोग केला जातो. व्हिडिओ पाहताना मुलांचे कान, डोळे आणि मन हे सर्व एकरूप होतात, ज्यामुळं मुलांचं आकलन चांगलं होतं. आज व्हिडिओ करण्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स, ऍप्लिकेशन्स वापरले जातात. 

काही ऍप्लिकेशन्स व सॉफ्टवेअर्स बेसिक व्हिडिओ करण्यासाठी उपयोगी आहेत, पण यापुढं जाऊन काही गोष्टी कल्पक व मनोरंजक करायच्या असतील तर आपल्याला ऍडव्हान्स ऍप्लिकेशन्स व सॉफ्टवेअर्स वापरणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये "क्रोमा इफेक्‍ट' हे टूल दिलेलं असतं. ज्या पद्धतीनं दूरदर्शनवरच्या बातम्या पाहताना आपण पाहिलं असेल, की जेव्हा निवेदक बातम्या सांगताना त्याच्या पाठीमागं असलेली स्क्रीन सतत बदलत असते. हे कशामुळं? तर त्याचं उत्तर आहे "क्रोमा इफेक्‍ट'. 

वास्तविक पाहता त्या निवेदकाच्या पाठीमागं स्क्रीनवर अशी कोणतीही हालचाल होत नसते. तिथं एक हिरव्या रंगाचं कापड बॅकग्राउंड वापरलेलं असतं आणि या हिरव्या रंगाच्या बॅकग्राउंडसह त्याचं चित्रण केलेलं असतं. पण जेव्हा हेच चित्रण एखाद्या क्रोमा इफेक्‍ट की असणाऱ्या ऍप्लिकेशनच्या मदतीने व्हिडिओ निर्मिती केली तर त्या हिरव्या कापडाऐवजी आपल्याला आवश्‍यक ते चित्रण, फोटो, व्हिडिओ आपण टाकू शकतो, ज्यामुळं व्हिडिओ आधीपेक्षा जास्त प्रभावी, परिणामकारक व उपयुक्त ठरतो. 

उदाहरण द्यायचं झालं, तर मोबाईलमध्ये काईनमास्टर या अँड्रॉइड ऍप्लिकेशनचा वापर करून तुम्ही क्रोमा इफेक्‍ट देऊ शकता. एका बाजूला सादर करणारा त्याचं सादरीकरण करत असतो तर त्याच दरम्यान बॅकग्राउंडला यासंबंधीची चित्रफीत, फोटो आल्यामुळं व्हिडिओचा विषय, संकल्पना समजायला मदत होते. म्हणून क्रोमा इफेक्‍ट हे इफेक्‍टिव्ह लर्निंग तसंच इफेक्‍ट टीचिंगसाठी उपयुक्त असे साधन आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

- राजकिरण चव्हाण, 
राज्य तंत्रस्नेही शिक्षक तथा जिल्हा समन्वयक, सर फाउंडेशन, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 



from News Story Feeds https://ift.tt/2G7IFUS

Comments

clue frame