Apple App स्टोअरवरून गुगल पे हटवलं

नवी दिल्ली - अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून गुगल पे अ‍ॅप हटवण्यात आलं आहे. अ‍ॅप हटवण्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र आयफोनच्या अ‍ॅप स्टोअरवर गुगल पे अ‍ॅप सध्या दिसत नाही. अ‍ॅप स्टोअरवरून गुगल पे हटवलं असलं तरी सध्या ज्यांच्या आय़फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल आहे ते सुरू आहे. पण अनेकांना ट्रान्झॅक्शन करण्यामध्ये अडचणी येत आहेत. 
गुगलने दिलेल्या माहितीनुसार गुगल पेमध्ये असलेले काही प्रॉब्लेम फिक्स करण्यासाठी ते हटवण्यात आलं आहे. अँड्रॉइडच्या अ‍ॅपमध्ये असे प्रॉब्लेम नसल्याने ते अद्याप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

गुगलकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, काही आयओएस युजर्सना गुगल पे अ‍ॅपमध्ये ट्रान्झॅक्शन फेलचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तो फिक्स करण्यासाठी सध्या टीम काम करत आहे. सोमवारी सायंकाळी पाचवाजेपर्यंत तरी गुगल पे अ‍ॅप स्टोअरवर आलेलं नव्हतं. अ‍ॅप लवकरच पुन्हा स्टोअरवर उपलब्ध होईल. त्यानंतर अपडेट करण्यात येईल असं सांगितलं आहे.

हे वाचा - Paytm, PhonePe, G-Pay ची एक्सक्लुझिव्ह क्यूआर कोड सेवा बंद होणार

याआधीही अशा प्रकारे अ‍ॅप हटवण्यात आली होती. एखाद्या अ‍ॅपमध्ये काही अडचण असेल तर ती हटवण्यात येतात. त्यामागे त्रुटी असलेल्या अ‍ॅपमुळे युजर्सचे नुकसान होऊ नये हा हेतू असतो. दरम्यान, कंपनीने मात्र स्पष्ट केलेलं नाही की गुगल पेमध्ये काय समस्या आहे आणि किती युजर्सना फटका बसला आहे. लवकरच गुगल पे अ‍ॅप स्टोअऱवर पुन्हा येईल असं म्हटलं जात आहे.

 



from News Story Feeds https://ift.tt/3ooojIx

Comments

clue frame