नवी दिल्लीः दिग्गज टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी ४जी मोबाइल हँडसेट खरेदीसाठी लोन देणार आहे. एअरटेल २ जी मोबाइल सर्विसेजचा वापर करीत असलेल्या सब्सक्रायबर्सला आपल्या पसंतीचा ४ जी स्मार्टफोनला एअरटेलद्वारे दिलेल्या लोनद्वारे खरेदी करता येईल. यासाठी त्यांना डाउन पेमेंट द्यावे लागणार आहे. त्यांना एक खास एअरटेल टॅरिफ प्लानसोबत हँडसेट मिळणार आहे. वाचाः एअरटेलने या ऑफरसाठी IDFC बँकेसोबत पार्टनरशीप केली आहे. या पार्टनरशीप अंतर्गत योग्य २जी ग्राहकांना लोन देण्यात येणार आहे. ज्यांना 4G आणि 5G मोबाइल हँडसेट्सची गरज आहे. किंवा जे कमीत कमी गेल्या ६० दिवसांपासून एअरटेलच्या नेटवर्कवर अॅक्टिव युजर्स आहेत. वाचाः या ऑफर अंतर्गत एअरटेलच्या लेडिंग पार्टनरला ३२५९ रुपयांचा एकूण डाउन पेमेंटला ६०३ रुपयांच्या प्रति महिना रुपयांचा ईएमआय या प्रमाणे पे करावे लागणार आहे. लोनची मर्यादा १० महिन्यांसाठी असणार आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण ९ हजार २८९ रुपये द्यावे लागतील. वाचाः एअरटेलच्या माहितीनुसार, ६ हजार ८०० रुपयांच्या या फोनची किंमतीसोबत एकूण ओपन मार्केटमध्ये याची किंमत ९ हजार ७३५ रुपये असणार आहे. तसेच एअरटेलच्या २८ दिवसांचा बंडल पॅक मिळणार आहे. याची किंमत २४९ रुपये आहे. या पॅकमध्ये १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. ३३० दिवसांच्या हिशोबाप्रमाणे या पॅकमध्ये एकूण २९३५ रुपये द्यावे लागतील. म्हणजेच ग्राहकांना एकूण ९७३५ रुपये द्यावे लागतील. एअरटेलने लोन ऑफर ला ‘Zero Extra Cost’ नाव दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oFGzNI
Comments
Post a Comment