नवी दिल्लीः जर तुम्हाला सॅमसंगचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. ९१ मोबाइल्सच्या माहितीनुसार, सॅमसंगने आपला प्रसिद्ध मिड रेंज स्मार्टफोन गॅलेक्सी M21 च्या दोन व्हेरियंटची किंमत नेहमीसाठी कमी केली आहे. किंमतीत कपात केल्यानंतर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ४९९ रुपयांऐवजी १३ हजार ९९९ रुपये झाली आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ४९९ रुपयांऐवजी १५ हजार ९९९ रुपये झाली आहे. नवीन किंमती १५ ऑक्टोबर पासून लागू करण्यात आल्या आहेत. वाचाः फोनला अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये २३ ऑक्टोबर पर्यंत अतिरिक्त सूट सोबत खरेदी करता येवू शकते. अॅमेझॉन सेलमध्ये ४ जीबी रॅमचा फोन १२ हजार ४९९ रुपये आणि ६ जीबी रॅमचा फोन १४ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. वाचाः फोनची खास वैशिष्ट्ये फोनमध्ये 2340x1080 पिक्सल रेजॉलूशनसोबत ६.४० इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. ६ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये Exynos 9611 SoC प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा आणि एक ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येवू शकतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 6000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kfC61x
Comments
Post a Comment