नवी दिल्ली - स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केली जाणारी अॅप्स किती सुरक्षित असतात हा चिंतेचा विषय आहे. आतापर्यंत गुगलने अनेकदा युजर्सची माहिती चोरणारी आणि स्पॅम अॅप प्ले स्टोअरवरून हटवली आहेत. याशिवाय इतरही सायबर सिक्युरीटी संस्था धोकादायक अशा अॅप्सची माहिती युजर्सना देत असतात. आता Avast ने गूगल प्ले स्टोअरवर असलेल्या धोकादायक गेमिंग अॅप्सबाबत युजर्सना इशारा दिला आहे.
अॅव्हास्टने दिलेल्या माहितीनुसार, 21 अॅप्सम ही हिडन अॅड्स फॅमिली ट्रोजनचा भाग आहेत. कंपनीने म्हटलं की, सध्या गुगल अॅडवेअर गेम्सच्या रिपोर्टची चौकशी करत आहे. सेन्सर टॉवरने दिलेल्या डेटानुसार संबंधित 21 अॅप्स जवळपास 80 लाखांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आली आहेत.
गुगल प्ले स्टोअरवर असलेल्या 21 अॅप पैकी अनेक अॅडवेअर गेमिंग अॅप्सचा प्रमोशनल कंटेटं युट्यूबसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. ही अॅप डाउनलोड करण्यात आल्यानंतर ज्या गोष्टींचे प्रमोशन केले जात होते ते दाखवलं जात नाही. मात्र युजर्सनच्या फोनमध्ये इतर अनावश्यक जाहिरातींचा भडीमार केला जातो.
हे वाचा - व्हॉट्सऍप वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे; कंपनीने दिली माहिती
अॅप्सची यादी
Shoot Them, Crush Car, Rolling Scroll, Helicopter Attack - NEW, Assassin Legend - 2020 NEW, Helicopter Shoot, Rugby Pass, Flying Skateboard, Iron it, Shooting Run, Plant Monster, Find Hidden, Find 5 Differences - 2020 NEW, Rotate Shape, Jump Jump, Find the Differences - Puzzle Game, Sway Man, Desert Against, Money Destroyer, Cream Trip - NEW, Props Rescue
अॅप्सबाबत अशीही माहिती दिली की, या प्रकारच्या अॅडवेअरमध्ये इतर मालवेअरपेक्षा कमी धोका असतो. मात्र अनेकदा इतर प्रोग्रॅम इन्स्टॉल करण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. यामुळे डेटा हॅकिंगसह इतर धोका निर्माण होऊ शकतो. अद्याप गुगलने या 21 अॅप्सबाबत माहिती दिलेली नाही.
from News Story Feeds https://ift.tt/31RId4J
Comments
Post a Comment