नवी दिल्ली : रिलायन्स जिओ ही सध्यघडीची आघाडीची मोबाईल सिमकार्ड कंपनी मानली जाते. रिलायन्स जिओचे प्लॅन्सदेखील ग्राहकांना आकर्षित करतील असे आहेत. रिलायन्सने आपल्या ग्राहकांना आणखी आकर्षित करण्याचा आणि खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. काय आहेत रिलायन्स जिओचे प्रीपेड प्लॅन्स... आपण हेच जाणून घेणार आहोत. जिओचे रिचार्ज प्लॅन्स 129 रुपयांपासून सुरु होतात. सध्या जिओकडे 129 रुपये, 149 रुपये, 199 रुपये आणि 249 रुपयांचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. जिओकडे अगदी 24 दिवसांपासून ते एक वर्षांपर्यंतचे प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत.
रुपये 129 चा प्रीपेड प्लॅन
129 रुपयांच्या जिओ रिचार्ज पॅकची व्हॅलिडीटी ही 28 दिवसांची आहे. या प्लॅननुसार ग्राहकाला 2 जीबी डेटा प्राप्त होतो. यासह या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग आहे तर नॉन जिओ कॉलिंगसाठी 1 हजार मिनिट्स ग्राहकाला मिळतात. 2 जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेट बंद पडत नाही तर स्पीड कमी होते. ते 64 Kbps इतके होते. या प्लॅननुसार जिओ ऍप्सचे ऍक्सेस ग्राहकाला प्राप्त होतात.
हेही वाचा - Positive Story : सर्वांत स्वस्त कोरोना टेस्टिंग कीट येणार बाजारात; आयआयटी खरगपूरची कमाल!
रुपये 149 चा प्रीपेड प्लॅन
जिओचा 149 रुपयांचा प्रीपेड प्लॅन हा सर्वांत किफायतशीर मानला जातो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 24 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज नवीन 1 जीबी डेटा प्राप्त होतो. म्हणजे एकूण महिन्यात ग्राहकाला 24 जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. त्यानंतर दररोज एक जीबी डेटा हा नव्याने प्राप्त होतो. तो संपल्यावर इंटरनेट स्पीड हे 64 Kbsp होते. या प्लॅननुसार ग्राहकांना दररोज 100 याप्रमाणे एसएमएसदेखील प्राप्त होतात. या प्लॅनमध्येही जिओ ऍप्सची सुविधा फ्रीमध्ये प्राप्त होते.
रुपये 199 चा प्रीपेड प्लॅन
या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. या प्रीपेड प्लॅननुसार ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा प्राप्त होतो. म्हणजेच महिन्याला एकूण 42 जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. या प्लॅनमध्येही जिओ नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग तर नॉन जिओ नेटवर्कसाठी 1 हजार मिनिट्स मिळतात.
हेही वाचा - Best Plans: 200 रुपयांपेक्षा कमी रुपयांचे रिचार्ज ; मिळणार 42 GB पर्यंत डेटा आणि कॉलिंग
रुपये 249 चा प्रीपेड प्लॅन
जिओचा हा प्लॅन 28 दिवसांचा आहे. यामध्ये दररोज दोन जीबी डेटा ग्राहकाला मिळतो. यानुसार, महिन्याला एकूण 56 जीबी डेटा ग्राहकाला प्राप्त होतो जो हाय स्पीड असतो. या प्लॅननुसार ग्राहकाला जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग तर नॉन जिओसाठी 1 हजार मिनिट्स मिळातात. या प्लॅननुसार ग्राहकाला दररोज 100 एसएमएस पाठवता येतात. तसेच जिओ ऍप्सची सुविधाही मोफत मिळते.
from News Story Feeds https://ift.tt/34r6OPT
Comments
Post a Comment