धक्कादायक! WhatsApp युजर्सच्या ऑनलाईन हालचाली होतायत ट्रॅक

नवी दिल्ली: 2020 च्या सुरुवातीपासूनच जगभरात कोरोनाचा प्रसार सुरु झाला होता. त्यानंतर जवळजवळ सर्व देशांनी लॉकडाउन जाहीर केलं होतं. लॉकडाउनमध्ये शाळा, कॉलेज, कंपन्या आणि असे बरेच व्यवहार बंद असल्याने सगळेजण घरी बसूनच होते. त्यामुळे याकाळात सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसलं आहे. वेळ भरपूर असल्याने लोकं त्यांचा वेळ सोशल मिडियावर घालवत असत. सोशल मिडियाच्या मदतीने बरेच जण त्यांचे कुटुंब, मित्र आणि सरकाऱ्यांसोबत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होते. 

व्हॉट्सअप युजर्सची संख्याही कोरोनाच्या काळात लक्षणीय वाढल्याचे दिसले आहे. तसं पहिल्यापासूनच या एपचे युजर्स बाकी सोशल मिडियातील एपच्या तुलनेत जास्त आहेत. काही दिवसांपुर्वी MSN.comच्या कोरोनाकाळातील सोशल मिडियाच्या वापराबद्दच्या आलेल्या एका बातमीने युजर्सना मोठा धक्का दिला होता. व्हॉट्सअप त्यांच्या डेटाच्या गोपिनीयतेबद्दल पहिल्यापासून सांगत आलं आहे. पण व्हॉट्सअपने त्यांचा डेटा दुसऱ्या बऱ्याच एपला सार्वजनिक केला असल्याचं सांगितलं जातंय. युजर्सचा एक्टीविटीचा मागोवा घेण्यासाठी हे केलं आहे, त्यामध्ये 'कुणाला बोलायला आवडतं, कोण कधी झोपतं तसेच कोण कधी जास्त एक्टीव्ह असतात' यांची माहिती कळत असल्याचे सांगितलं जातंय.  

ड्रग्स प्रकरणः रिया, शौविकची मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव

व्हॉटसअॅपवर समोरची व्यक्ती ऑनलाइन आहे की नाही हे दाखवण्यासाठी सिग्नल असतो. बऱ्याचदा युजर्स लास्ट सीन ऑफ ठेवतात. अशावेळी जेव्हा ते ऑनलाइन असतात तेव्हाच माहिती इतरांना समजू शकते. याचा वापर कंपन्या युजर्सच्या सवयी जाणून घेण्यासाठी करत असतात. ही गोष्ट बऱ्याचदा आपल्याला माहित नसते. याची परवानगी आपण नकळत ते एप डाउनलोड करताना देत असतो. यावरून आता हे देखील समजत आहे की गोपनीयतेबद्दल आश्वासन देणारे एप्सदेखील युजर्सचा डेटा उघडा करू शकतात. व्हॉट्सअप सांगत आलं आहे की व्हॉट्सअपवर केली जाणारी चॅटींग ही सुरक्षित असून ती encrypting असते. पण आता यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.



from News Story Feeds https://ift.tt/2FVBCOS

Comments

clue frame