नवी दिल्ली - व्हॉट्सअप हे सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेंजर एप आहे. व्हॉट्सअपकडून नेहमीच नवनवीन फीचर्स अपडेट केली जातात. दरम्यान, एप अपडेट न केल्यानं त्यात काय नवीन फीचर्स आली आहेत याची कल्पना युजर्सना नसते. त्यामुळे व्हॉट्सअप अपडेट केल्यानंतर त्यामध्ये कोणती नवीन फीचर आली आहेत हे समजू शकेल. भविष्यात व्हॉट्सअप आणखी नवीन व उपयुक्त अशी फीचर आणण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे. आताही अशीच काही भन्नाट फीचर्स अपडेट होणार आहेत.
व्हॉट्सअप डूडल्स-
सुरुवातीला व्हॉट्सअप डूडल्स फक्त डेस्कटॉप वेब व्हर्जनवरही मिळत होतं. आता व्हॉट्सअप अपडेट केल्यानंतर मेसेजिंग अॅप अँड्रॉयड व्हर्जनसाठी बॅकग्राउंड डूडल्ससह येवू शकतं.
ग्रुप कॉलसाठी वेगळी रिंगटोन-
व्हॉट्सअपमध्ये भविष्यातील अपडेट्समध्ये व्हॉट्सअॅप युजर्सला ग्रुप कॉल करण्यासाठी दुसरं वेगळी रिंगटोन ठेवण्याचा पर्याय मिळू शकतो. त्यामुळे युजर्स कॉल आल्यानंतर फोन पाहताही आपल्याला समजू शकेल की हा ग्रुप कॉल आला आहे. सध्या आपल्या फोनमध्ये नॉर्मल कॉल आल्यावर आणि व्हॉट्सअप कॉल आल्यावरच रिंगटोन एकच आहे.
सावधान! गुगल प्ले स्टोअरने हटवलेली 17 Apps, तुमच्या फोनमध्ये नाहीत ना?
एनिमेटेड स्टिकर्स
व्हॉट्सअपच्या चॅटिंगचा अनुभव उत्तम करण्यासाठी युजर्संना लवकरच एनिमेटेड स्टीकर्स मिळू शकतात. सध्या कंपनी या स्टीकर्सला टेस्ट करीत आहे. बऱ्याच मेसेजिंग एपमध्ये आधीपासूनच हे फीचर मिळत आहे.
शॉर्टकट कॅटलॉग अॅक्सेस-
व्हॉट्सअपच्या बिझनेस अकाउंटवर युजर्सला कॅटलॉग फीचरचे शॉर्टकट अॅक्सेसही मिळू शकेल. याप्रमाणे पोर्टफोलियो पाहता येणार आहे. तसंच दुसरं कॉलिंग बटन देखील या फीचरमध्ये आणखी चांगल्या पर्यायाची भर घालणारं ठरेल.
हे वाचा - 'कुठेच न जाणाऱ्या' विमानाचं तिकिट 2 लाख रुपयांपर्यंत; तरीही 10 मिनिटांत बुकिंग फुल्ल
नवीन कॉलिंग यूआय
भविष्यातील अपडेटमध्ये नवीन उत्तम कॉल्स इंटरफेस पाहायला मिळू शकतं. यानंतर कॉल बटन खाली मूव्ह केले जावू शकते. कॉल इंटरफेस मध्ये इन्फोचं बटन, ऑडियो बटन आणि व्हिडिओ बटन सुद्धा कॅमेरा आणि मेसेजिंग बटनाबरोबर दिसतील.
(edited by- pramod sarawale)
from News Story Feeds https://ift.tt/33LgAup
Comments
Post a Comment