Tecno Spark 6 Air चा जास्त स्टोरेजचा व्हेरियंट लाँच, जाणून घ्या किंमत

नवी दिल्लीः चा नवीन व्हेरियंट भारतात लाँच करण्यात आला आहे. या व्हेरियंटला ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजसोबत लाँच करण्यात आले आहे. हा या फोनचा तिसरे व्हेरियंट आहे. याआधी कंपनीने जुलै मध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज लाँच केले होते. त्यानंतर कंपनीने ३ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेज व्हेरियंट लाँच केले होते. वाचाः नवीन व्हेरियंटची किंमत कंपनीने नवीन व्हेरियंट ९ हजारांत लाँच केले आहे. २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी व्हेरियंटची किंमत ७ हजार ९९९ रुपये तर ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजची किंमत ८ हजार ४९९ रुपये आहे. टेक्नो स्पार्क ६ एयरचे नवीन व्हेरियंट २५ सप्टेंबर पासून अॅमेझॉनवर उपलब्ध होणार आहे. वाचाः टेक्नो स्पार्क ६ एअरचे वैशिष्ट्ये या फोनमध्ये ७ इंचाचा मोठा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720x1640 पिक्सल आहे. फोन अँड्रॉयड १० गो एडिशन ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. या व्हेरियंटमध्ये ३ जीबी रॅम सोबत ६४ जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येवू शकते. तसचे मया फोनमध्ये मीडियाटेक ए२२ प्रोसेसर आणि 6,000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेरा मध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक एआय लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कनेक्टिविटीसाठी यात 4G LTE, ड्यूल-बँड वायफाय, ब्लूटूथ v5.0 दिला आहे. या फोनमध्ये मागच्या बाजुला फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iUoUyh

Comments

clue frame