Paytm प्ले स्टोअरवरून हटवलं, नियमांच्या उल्लंघनामुळे गुगलची मोठी कारवाई

नवी दिल्ली - गुगलने इंडियन फायनान्शियल सर्व्हिस अॅप पेटीएम प्ले स्टोअरवरून हटवलं आहे. कंपनीच्या धोरणांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केल्याचे समजते. पेटीएम हे भारतात मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणार अॅप असून महिन्याला तब्बल 5 कोटी युजर्स सक्रीय आहेत. या अॅपच्या सहाय्याने युजर्स एकमेकांना पैसे पाठवू शकतात. पण आता हे अॅप प्ले स्टोअरवरून हटवण्यात आलं आहे. 

प्ले स्टोअरवरून हटवण्यात आल्यानंतर गुगलने म्हटलं की, प्ले स्टोअर ऑनलाइन कॅसिनो आणि इतर अॅप ज्यातून भारतात खेळामध्ये जुगार लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अॅपना प्रतिबंधित करते. आय़पीएल सुरु होण्याच्या एक दिवस आधीच गुगलने हा मोठा निर्णय घेतला आहे. पेटीएमकडून सातत्याने कंपनीच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे वृत्त टेक क्रंचने दिले आहे.

इतर बाजारांमध्ये कंपनीच्या पॉलिसींचे उल्लंघन होत नाही. गाइडलाइन्सचे पालन केले जाते. मात्र जर एखादे अॅप ग्राहकांना इतर संकेतस्थळांवरून पैसे किंवा रोख रकमेची बक्षिसे जिंकण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी सपोर्ट करत असेल तर ते प्ले स्टोअरचं उल्लंघन असल्याचं गुगलने म्हटलं आहे. 



from News Story Feeds https://ift.tt/3mzq0BK

Comments

clue frame