५५०० रुपयांनी स्वस्त झाले OnePlus आणि Samsung चे स्मार्टफोन

नवी दिल्लीः जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. सॅमसंग, विवो आणि वनप्लस शिवाय अन्य कंपन्यांनी आपल्या प्रसिद्ध स्मार्टफोनच्या किंमतीत कायमची कपात केली आहे. वाचाः OnePlus 7T Pro या फोनच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या फोनमध्ये ५ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. किंमतीत कपातीनंतर OnePlus 7T Pro ची किंमत ४७ हजार ९९९ रुपयांऐवजी ४३ हजार ९९९ रुपये झाली आहे. वनप्लसचा हा फोन प्रीमियम आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा QHD+ फ्लूइड AMOLED डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅ्गन ८५५ प्लस प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठीयात ४८ मेगापिक्सलचा लेन्स सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियलमी 6i मिड रेंज सेगमेंटमध्ये रियलमीचा हा फोन स्वस्त झाला आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपयाऐवजी १२ हजार ९९९ रुपये झाली आहे. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपयांऐवजी १३ हजार ९९९ रुपये झाली आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. मीडियाटेक हीलियो G90T प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक ८ मेगापिक्सलचा एक २ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4300 mAh बॅटरी दिली आहे. सॅमसंग गॅलेक्सी A51 सॅमसंगच्या या फोनची किंमत ५५०० रुपयांनी स्वस्त करण्यात आली आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपयाऐवजी आता २४ हजार ४९९ रुपये झाली आहे. ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सोबत येणाऱ्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4000mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये Exynos 9611 प्रोसेसर दिला आहे. रियलमी ६ १७ हजार ९९९ रुपये किंमतीचा हा फोन फ्लिपकार्टवर १४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. मीडियाटेक हीलियो जी९० टी प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या या फोनध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वीवो S1 प्रो विवोच्या या फोनची किंमत २ हजारांची कपात करण्यात आली आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत २० हजार ९९० रुपयांऐवजी १८ हजार ९९० रुपये झाली आहे. ६.३८ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली आहे. ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZWowrx

Comments

clue frame