रियलमीची Narzo 20 सीरीज भारतात लाँच, सीरीजमध्ये ३ स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः Realme ने सोमवारी भारतात आपली सीरीजचे तीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Realme Narzo 20, , मध्ये दमदार फीचर्स दिले आहेत. नवीन स्मार्टफोन हे मागच्या रियलमी नार्जो १० आणि नार्जो १० ए चे अपग्रेड व्हेरियंट आहेत. या फोनला एका ऑनलाइन इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. वाचाः फोनची किंमत रियलमी नार्जो २० प्रो च्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. फोनचा पहिला सेल २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट आणि रियलमी डॉटकॉम आणि ऑफलाइन स्टोर्सवर उपलब्ध होणार आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून फोनला १ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच ६ महिन्यांची नो कॉस्ट ईएमआय वर फोन खरेदी करता येवू शकणार आहे. वाचाः रियलमी नार्जो २० च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १० हजार ४९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ११ हजार ४९९ रुपये आहे. हँडसेटला विक्ट्री ब्लू, आणि ग्लोरी सिल्वर कलरमध्ये लाँच करण्यात आले आहे. फोनचा पहिला सेल २८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट आणि रियलमीची वेबसाइटवर सुरू होणार आहे. वाचाः रियलमी नार्जो १० ए च्या ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार ४९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे. फोनची विक्री ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट आणि कंपनीची वेबसाइटवरून करता येणार आहे. Realme Narzo 20 Pro: चे वैशिष्ट्ये रियलमी नार्जो २० प्रोमध्ये ६.५ इंचाचा फुल स्क्रीन डिस्प्लेआहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G95 गेमिंग प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा इन डिस्प्ले कॅमेरा दिला आहे. फोनध्ये दोन सिम व एक मायक्रोएसडी स्लॉट दिला आहे. अँड्रॉयड १० बेस्ड रियलमी यूआयवर काम करतो. फोनला पॉवर देण्यासाठी 4500mAh बॅटरी आणि ६५ वॉट सुपरडार्ट चार्ज सपोर्ट करते. वाचाः Realme Narzo 20: चे वैशिष्ट्ये रियलमी नार्जो२० मध्ये ६.५ इंचाचा मिनी ड्रॉप फुलस्क्रीन डिस्प्ले आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 प्रोसेसर दिला आहे. फोनला ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी व १२८ जीबी इंटरनल स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 6000mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट टाइप सी क्विक चार्ज सपोर्ट करते. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा एआय प्रायमरी कॅमेरा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. Realme Narzo 20A: चे वैशिष्ट्ये रियलमी नार्जो २० सीरीजचा हा सर्वात स्वस्त फोन आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा मिनिड्रॉप फुलस्क्रीन डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ३ जीबी रॅम प्लस ४ जीबी रॅप पर्याय दिले आहेत. इनबिल्ट स्टोरेज साठी ३२ जीबी आणि ६४ जीबी ऑप्शन दिले आहेत. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. रियलमीच्या या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरासोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये एचडी सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. फोन तीन कलरमध्ये येतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33LdczR

Comments

clue frame