गॅलेक्सी M01 Core आणि M01s झाले स्वस्त, ५ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा सॅमसंग फोन

नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंगकडून एन्ट्री लेवल सेगमेंटमधील दोन फोन स्वस्त करण्यात आले आहे. भारतात आणि च्या फोनच्या किंमतीत कायमची कपात करण्यात आली आहे. 91Mobiles ने रिटेल सोर्सेजच्या हवाल्याने कन्फर्म केले आहे की, जुलै मध्ये लाँच करण्यात आलेल्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये आता ५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. वाचाः Samsung Galaxy M01s च्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत आता ९९९९ रुपयांऐवजी ९ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. तसेच Samsung Galaxy M01 Core च्या १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५ हजार ४९९ रुपयांऐवजी ४ हजार ९९९ रुपये झाली आहे. तर च्या २ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत ६ हजार ४९९ रुपयांऐवजी ५ हजार ९९९ रुपये झाली आहे. वाचाः Samsung Galaxy M01sची वैशिष्ट्ये या फोनमध्ये ६.२ इंचाचा HD+ TFT इनफिनिटी-V डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सोबत आहे. फोनमध्ये MediaTek Helio P22 चिपसेट दिला आहे. यात ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा ड्यूल कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः Samsung Galaxy M01 Coreचे वैशिष्ट्ये या फोनमध्ये ५.३ इंचाचा HD+ TFT डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये MediaTek MT6739 प्रोसेसर दिला आहे. २ जीबी रॅम आणि ३२ जीबी पर्यंत स्टोरेजच्या या फोनमध्ये अँड्रॉयड 10 Go Edition दिले आहे. स्वस्त फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 3000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2FIgFGV

Comments

clue frame