Google आणि Apple ने हटवली 7 ॲप्स, तुमच्याकडे असतील तर Delete करा

नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून गुगलने प्ले स्टोअऱवर असेलली अनेक ॲप्स रिमूव्ह केली आहेत. आता अव्हास्टच्या सायबर सिक्युरिटी रिसर्चर टीमने 7 मालशिअस ॲडवेअर स्कॅम शोधला आहे. ही ॲप्स गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून युजर्सनी डाऊनलोड केली आहे. यातून डेव्हलपर्सनी जवळपास 5 लाख डॉलर्सची कमाई केली आहे. ही ॲप्स टिकटॉक आणि इन्स्टाग्राम सारख्या प्रोफाइल्सच्या माध्यमातून हे डाउनलोड करण्यात आले होते. 

Avast एका ब्लॉग पोस्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, अशा तीन प्रोफाइल्स समोर आल्या आहेत ज्या टिकटॉकवर मालशिअस ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी पुश करत होत्या. टिकटॉकवर एका प्रोफाइलवर तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. संशोधकांनी इन्स्टाग्रामवर अशा प्रोफाइल्स शोधून काढल्या आहेत. यात 7 अशी ॲप्स धोकादायक असल्याची माहिती दिली आहे.

हे वाचा - धक्कादायक! WhatsApp युजर्सच्या ऑनलाईन हालचाली होतायत ट्रॅक

धोकादायक ॲप्सपैकी ThemeZone, Shawky App Free, Shock My Friends, Ultimate Music Downloader, Free Download Music ही ॲप्स गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आली आहेत. तर ॲपल ॲप स्टोअरने Shock My Friends – Satuna, 666 Time, ThemeZone, Live Wallpapers आणि shock my friend tap roulette v ॲप रिमूव्ह केली आहेत. 

ॲव्हास्टच्या टीमने ही ॲप्स तरुणांना टार्गेट करण्यासाठी तयार केल्याचं म्हटलं आहे. यामध्ये सतत पॉप अपमधून ॲप सजेस्ट केली जातात. त्यातून युजर्सकडून अतिरिक्त सर्विससाठी 2 ते 10 डॉलर इतके शुल्क आकारले जाते. यातील काही ॲप्स जाहीराती दाखवतात. त्या स्क्रीनवर आल्यानंतर युजर्सना त्यावर क्लिक करण्याशिवाय पर्याय नसतो. यातून डेव्हलपर्स पैसे कमावतात. 

हे वाचा - चिमुकलीची कमाल! गुगलला केली स्कॅम अ‍ॅप्स शोधून देण्यात मदत

ॲनालिस्ट जेकब वावरा यांनी सांगितलं की, जी ॲप्स शोधली आहेत ती गुगल, ॲपलच्या ॲप पॉलिसीचं उल्लंघन करतात. ही ॲप्स फंक्शनॅलिटीबाबत खोटे दावे करतात आणि जाहीराती दाखवतात. इन्स्टॉल केल्यानंतर लगेच ओरिजनल ॲप आयकॉन दिसणं बंद होतं. गुगलने आतापर्यंत अशा अनेक ॲप्सना हटवलं आहे. तसंच फोनमध्ये अशी ॲप्स असतील तर ती तात्काळ डिलिट करा असंही सांगण्यात आलं आहे. 



from News Story Feeds https://ift.tt/33XtGVp

Comments

clue frame