सॅमसंग Galaxy A72 असणार सॅमसंगचा पहिला ६ कॅमेऱ्याचा फोन, समोर आले डिटेल्स

नवी दिल्लीः सॅमसंग नवीन फीचर्स आपल्या Galaxy S सीरीज आणि Galaxy Note सीरीज मध्ये आणण्याआधी ए सीरीजचे फोन्स घेऊन आली आहे. कंपनी जगातील पहिला क्वॉड कॅमेरा सेटअप आपल्या Galaxy A9 (2018) मध्ये आणले होते. आता एका नवीन रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे की, कंपनी पहिल्यांदा रियर पॅनेलवर पाच सेन्सरचा पेंटा कॅमेरा सेटअप Galaxy A72 मध्ये देवू शकते. वाचाः खूप कमी असे फोन आहेत. ज्यात रियर पॅनेलवर पाच सेन्सरचे पेंटा कॅमेरा सेटअप मिळतो. शाओमी, हुवावे आणि नोकियाकडून पेंटाचे फोन लाँच केले आहेत. पुढील वर्षी काही गोष्टी बदलू शकतात. The Elec च्या रिपोर्टमध्ये टिप्सटर अभिषेक यादव यांच्या हवाल्याने म्हटले की, पेंटा कॅमेरा सेटअप मेनस्ट्रिम असू शकते. रिपोर्टच्या माहितीनुसार, गॅलेक्सी ए ७२ सोबत याची सुरुवात होऊ शकते. वाचाः असा असेल पेंटा कॅमेरा सेटअप समोर आलेल्या रिपोर्ट्समध्ये म्हटले की, Galaxy A72 शिवाय बाकी गॅलेक्सी स्मार्टफोनमध्ये सुद्धा कॅमेरा सेन्सर वाढू शकतो. तसेच रिपोर्टमध्ये हेही म्हटले की, या फोनच्या कॅमेरा सेटअपशी जोडलेले डिटेल्स शेयर करण्यात आले आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर शिवाय १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, ८ मेगापिक्सलचा सेन्सर ३एक्स टेलिफोटो लेन्स सोबत ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. वाचाः ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा नवीन फोनमध्ये सॅमसंग रियर पॅनेलवर पेंटा कॅमेरा सेटअप शिवाय ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देवू शकतो. समोर आलेल्या पेंटा सिस्टम दमदार असू शकतो. तसेच सॅमसंगचा हा मिडरेंज फोन समोर आल्यानंतर बाकी डिव्हाईसेजची जागा घेवू शकतो. रिपोर्टमध्ये केवळ फोनच्या कॅमेऱ्याची वैशिष्ट्ये शेयर करण्यात आली आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि ५जी कनेक्टिविटीचा सपोर्ट मिळणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Geyxtq

Comments

clue frame