सॅमसंग गॅलेक्सी F41 ते iPhone 12 पर्यंत, येताहेत दमदार स्मार्टफोन

नवी दिल्लीः फेस्टिव सीजन लवकरच येणार आहे. मोबाइल मेकर कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहेत. सॅमसंगपासून अॅपल आणि वनप्लस यासारख्या दिग्गज कंपन्या लवकरच नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहेत. हे सर्व फोन तगड्या फीचर्स सोबत येणार आहेत. वाचाः सॅमसंगचा हा फोन ८ ऑक्टोबरला एफ सीरीज अंतर्गत लाँच होणारा पहिला फोन आहे. हा एक मिड रेंज स्मार्टफोन असणार आहे. याची किंमत १५ हजार ९९९ रुपये असू शकते. फोनमध्ये सुपर अमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले, 6000mAh बॅटरी आणि ६ जीबी रॅम तसेच Exynos 9611 प्रोसेसर मिळू शकतो. यात ट्रिपल रियर कॅमेरा आणि सिंगल सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. वाचाः oneplus 8T हा कंपनीचा ५ जी स्मार्टफोन असणार आहे. या फोनला १४ ऑक्टोबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. स्मार्टफोनची किंमत ५१ हजार ९९९ रुपये असू शकते. फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ मिळू शकतो. फोनमध्ये फ्लूइड अमोलेड डिस्प्ले सोबत ४८ मेगापिक्सलचा प्लस 16MP + 5MP + 2MP चा क्वॉड रियर कॅमेरा तसेच ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. 4,500mAh बॅटरी मिळू शकते. वाचाः Google Pixel 5 गुगल आपला नवीन स्मार्टफोन Google Pixel 5 लवकरच लाँच करू शकते. फोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉयड ११ ऑपरेटिंग सिस्टम असणार आहे. याची किंमत ७९ हजार ९०० रुपये असू शकते. फोनमध्ये ६.० इंचाचा ओलेड डिस्प्ले आणि 4,080mAh बॅटरी दिली जावू शकते. ८ जीबी रॅम आणि Exynos 9611 प्रोसेसर मिळू शकतो. फोटोग्राफीसाठी यात 16MP + 12.2MP ड्यूल रियर कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि १२८ जीबीची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. वाचाः Apple आणि 12 Pro अॅपल लवकरच आयफोन १२ सीरीज लाँच करणार आहे. अॅपल आयफोन १२ मध्ये ५.५ इंचाचा डिस्प्ले, A14 बायोनिक चिपसेट, 12MP + 12MP चा रियर कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तर आयफोन १२ प्रोमध्ये ६.७ इंचाचा सुपर रेटिना ओलेड डिस्प्ले, ६ जीबी रॅम आणि A14 बायोनिक चिपसेट सोबत क्वॉड रियर कॅमेरा आणि सिंगल सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cFucvq

Comments

clue frame