चिमुकलीची कमाल! गुगलला केली स्कॅम अ‍ॅप्स शोधून देण्यात मदत

नवी दिल्ली: दिवसेंदिवस विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होत असल्याचे दिसत आहे. कालच भारत सरकारने कोरोनाकाळात शरीरातील ऑक्सिजन मोजण्यासाठी असलेल्या अ‍ॅप्सचा वापर करु नये असा इशारा दिला आहे. अशा विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून रोज लोकांची फसवणूक केली जात आहे. आता गुगलने देखील त्यांच्या प्ले स्टोअरवरून असे धोकादायक 17 अ‍ॅप्स काढले आहेत.

सध्या गुगल प्ले स्टोअरसोबत अ‍ॅपल प्ले स्टोअरवरील अनेक अ‍ॅप्स सेक्युरिटी चेकमधून जात आहेत. यातूनही स्कॅमर युजर्सना अनेक अ‍ॅप्सच्या मदतीने नुकसान पोहचवतात. सध्या प्ले स्टोअरवर 24 लाखांपेक्षा जास्त डाऊनलोड झालेल्या अ‍ॅप्सची माहिती उघड झालेली आहे. अशी अ‍ॅप्स लहान मुलांना लक्ष्य करत असतात. विषेश म्हणजे काही स्कॅम अ‍ॅप्सचा शोध घेण्यासाठी एका लहान मुलीने सिक्योरिटी रिसर्च टिमची मदत केली आहे. आता गुगलने कारवाई करत हे सर्व अ‍ॅप्स काढून टाकले आहेत.

थांबा! ऑक्सिजन चेक करण्यासाठी Apps वापरताय? भारत सरकारने दिला इशारा

प्रागमध्ये राहणाऱ्या एका चिमुकलीने मालवेअर असणाऱ्या सात अ‍ॅप्सची माहिती कळवून गुगलला मदत केली आहे. आतापर्यंत युजर्सना फसवून अटॅकर्सनी 5 लाख डॉलरची कमाई केली होती. ही सर्व माहिती 'SensonTower' कडून शेअर केली आहे. अशाप्रकारच्या 7 अ‍ॅप्सबद्दलची माहिती समोर आली आहे. अ‍ॅडवेयर स्कॅम्सच्या साहाय्याने युजर्सना नुकसान पोहचवून अटॅकर पैसे कमवत  असतात. काढून टाकलेली ही मालवेअर अ‍ॅप्स मनोरंजन, वॉलपेपर, आणि म्युझिकची होती, तसेच ती अ‍ॅप्स युजर्सना वेगवेगळ्या जाहीरात दाखवायचे. विषेशतः ही अ‍ॅप्स लहान मुलांना लक्ष्य करत होती. 

कशी केली चिमुकलीने गुगलची मदत- 
चेक रिपब्लिकमध्ये सध्या 'Be Safe Online Project' चालवण्यात आलं आहे. यामध्ये मुलांना ऑनलाईन सुरक्षित कसं रहायचं ते सांगितलं जात आहे. या कार्यक्रमात एका लहान मुलीने स्कॅम अ‍ॅप्सपैकी एका अ‍ॅप्सला टिकटॉक प्रोफाईलवर प्रमोट केलं जात असल्याचं रिपोर्ट केलं. यानंतर मालवेअर अ‍ॅप्सचं हे प्रकरण समोर आलं. त्यामुळे त्यां धोकादायक अ‍ॅप्सना आता काढून टाकलं आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅप्सचं प्रमोशन इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवरही केलं जात होतं. ही अ‍ॅप्स युजर्सच्या डिव्हायसमध्ये जाऊन नुकसान करत होते. 

धक्कादायक! WhatsApp युजर्सच्या ऑनलाईन हालचाली होतायत ट्रॅक

गुगलने हटवले अ‍ॅप्स- 
मालवेअर अ‍ॅप्सबद्दल माहिती मिळताच गुगल आणि अ‍ॅपल या दोघांनाही याची माहिती देण्यात आली होती. तसंच या अ‍ॅप्सना प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आलं आहे. अवास्टच्या माहितीनुसार हे  अ‍ॅप्स विविध जाहिराती दाखवून युजर्सला 2 ते 10 डॉलर पैसे चार्ज करत होते. यातील काही  अ‍ॅप्स साध्या गेम आहेत. तर काही अ‍ॅप्सचा वापर वॉलपेपर बदलण्यासाठी केला जात होता. एका हिंदी वेबसाईटने ही बातमी दिली आहे.

(edited by- pramod sarawale)



from News Story Feeds https://ift.tt/303Af7W

Comments

clue frame