गुगलचे पद्मश्री आरती साहा यांच्या जयंतीनिमित्त खास डूडल

नवी दिल्लीः समाजात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या लोकांची आठवण म्हणून गुगल खास डूडल साकारत असते. आज २४ सप्टेंबर रोजी गुगलने आरती साहा यांच्या () यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त एक खास डूडल साकारले आहे. यांचे पूर्ण आरती साहा गुप्ता असे आहे. आज त्यांची जयंती. आरती यांचा जन्म २४ सप्टेंबर १९४० रोजी झाला होता. वाचाः वाचाः आरती साहा भारत आणि आशियाची पहिली महिला इंग्रजी चॅनल पार करणाऱ्या प्रसिद्ध स्विमर होत्या. कोलकाता, पश्चिम बंगालच्या राहणाऱ्या आरती साहा यांनी केवळ ४ वर्षाची असताना पोहोयला सुरुवात केली होती. सचिन नाग यांनी आरतीच्या प्रतिभेला ओळखले आहे. १९४९ मध्ये आरती यांनी अखिल भारतीय रेकॉर्ड सह राज्यस्तरीय स्विमर स्पर्धा जिंकल्या. आरती साहा यांनी हेलसिंकी ऑलिम्पिक मध्ये सहभाग घेतला होता. वाचाः वाचाः भारतीय पुरूष मिहीर सेन यांची प्रेरणा घेऊन आरती यांनी इंग्लीश चॅनल पार करण्याचा प्रयत्न केला. २९ सप्टेंबर १९५९ रोजी त्या आशियात असे करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. आरती यांनी ४२ मैलचे अंतर केवळ १४ तास २० मिनिटात पूर्ण केले होते. त्यांच्या अतूलनीय कामगिरीसाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होते. १९९८ मध्ये भारतीय पोस्ट कार्यालयाने भारतीय महिलांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांच्यावर एक तिकीट प्रकाशीत केले होते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/366z77d

Comments

clue frame