मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाच्या चौकशीत अनेकांची नावं पुढं येत आहे. रिया चक्रवर्तीच्या (Reha Chakravarthi) चौकशीतून आणि तिच्या व्हॉट्सअप चॅटमधून अनेकांचा पर्दाफाश होत असल्याचं दिसत आहे. रियाच्या चौकशीबरोबरच तिचे आणि या प्रकरणातील इतरांचे व्हॉट्सअप चॅट लिक झाल्यामुळं व्हॉट्सअपच्या (WhatsApp)विश्वासर्हतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालंय.
व्हॉट्सअप मेसेजिंग सुरक्षित
व्हॉट्सअपवर झालेले जुने चॅट्स मिळवण्यात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)यशस्वी झाल्यामुळं या प्रकरणाच्या खोलात जाण्यात यश मिळत असल्याचं दिसत आहे. पण, यावर आता व्हॉट्सअपला खुलासा करण्याची वेळ आलीय. व्हॉट्सअप चॅट लिक झाले असले तरी, व्हॉट्सअपवरील चॅट सुरक्षित आहे. कोणीही थर्ड पार्टी तुमचे मेसेज ऍक्सेस करू शकत नाही, दोन मोबाईल व्यतिरिक्त तिसऱ्या कोणालाही मेसेज वाचता येत नाही, असं व्हॉट्सअपनं म्हटलंय.
हे वाचा - Google आणि Apple ने हटवली 7 ॲप्स, तुमच्याकडे असतील तर Delete करा
व्हॉट्सअपचं स्पष्टीकरण
या संदर्भात व्हॉट्सअपच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, व्हॉट्सअपचे मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्शननुसार पूर्णपणे सुरक्षित आहेत. या दरम्यान तिसरा कोणीही हे मेसेज वाचू शकत नाही. अगदी व्हॉट्सअपलाही हे मेसेज वाचता येत नाहीत. व्हॉट्सअपचं सायनिंग केवळ एका नंबरने होतं, असं कंपनीनं म्हटलंय. सुशांतसिंह प्रकरणाच्या चौकशी दरम्यान, जुन्या व्हॉट्सअप चॅटचा आधार घेत एनसीबीने अनेक बड्या कलाकारांना समन्स बजावलंय. त्यामुळं देशभरात व्हॉट्सअप सुरक्षित नसल्याची ओरड होऊ लागली आहे. त्यामुळंच कंपनीला खुलासा करावा लागत आहे. चौकशी अधिकाऱ्यांना कायदेशीर पद्धतीने जुना डेटा मिळवण्याची अनुमती आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना फॉरेन्सिक पद्धतीनं या डेटापर्यंत पोहचावं लागतं, असं व्हॉट्सअपकडून स्पष्ट करण्यात आलंय.
हे वाचा - धक्कादायक! WhatsApp युजर्सच्या ऑनलाईन हालचाली होतायत ट्रॅक
काय घडलंय?
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीची एनसीबीकडून चौकशी झाल्यानंतर बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन हळू हळू उघड होत गेलंय. याप्रकरणात काही जुन्या चॅट्समधून दीपिका पदूकोन, रकूल प्रीत सिंह, सारा अली खान, अशी मोठी नावं पुढं आली आहेत. याप्रकरणात तिन्ही अभिनेत्रींना आणि त्यांच्या मॅनेजरला समन्स बजावण्यात आलाय. आज, दीपिका पदुकोन आणि रकूल प्रति सिंह एनसीबीच्या चौकशीला सामोऱ्या जात आहेत.
from News Story Feeds https://ift.tt/3mPfK8L
Comments
Post a Comment