जिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे की, रिलायन्स जिओ लवकरच अँड्रॉयडवर काम करणारा स्वस्त स्मार्टफोन घेऊन येणार आहे. यासाठी कंपनीने स्थानिक कंपन्यासोबत पार्टनरशीप सुद्धा केली आहे. कंपनी लोकल सप्लायर्सला भारतात प्रोडक्शन कॅपिसिटी वाढवण्यासाठी सांगितले आहे. कंपनी पुढील वर्षी २० कोटी स्मार्टफोन्स युनिट्स तयार करू शकेल. वाचाः ही असू शकते किंमत कंपनीचा हा नवीन फोन जिओ फोनचे एक व्हर्जन असू शकते. ताज्या रिपोर्टमध्ये फोनची संभावित किंमत सांगितली आहे. Bloomberg च्या रिपोर्टनुसार, गुगलच्या अँड्रॉयड आधारित जिओचा हा फोन जवळपास ४ हजार रुपये (५४ डॉलर) चा असू शकतो. हा स्मार्टफोन रिलायन्स जिओचा स्वस्त प्लानसोबत येवू शकतो. वाचाः चीनी फोन कंपन्यांसाठी अडचण रिलायन्स जिओचे लक्ष्य पुढील दोन वर्षात १५ ते २० कोटी फोन विकण्याचे आहे. इंडिया सेलुलर अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशनच्या माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात भारतात १६.५ कोटी स्मार्टफोन आणि जवळपास इतकेच बेसिक फोन असेंबल झाले आहेत. रिलायन्स जिओच्या स्वस्त स्मार्टफोनने चिनी कंपन्या खास करून शाओमीचा जबरदस्त टक्कर मिळणार आहे. वाचाः एअरटेल सुद्धा आणत आहे ४जी डिव्हाइस मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, केवळ रिलायन्स नाही तर भारती एअरटेल सुद्धा ४ जी स्मार्टफोन घेऊन येण्याची तयारी करीत आहे. जिओच्या स्वस्त फोनने एअरटेल आणि वोडाफोनसाठी हे धोका बनले आहे. २ जी ग्राहक जिओमध्ये येवू शकतात. जुलै मध्ये गुगलने जिओत ४.५ अब्ज डॉलर (जवळपास ३३ हजार ६०० कोटी रुपये) ची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. याद्वारे गुगल आणि जिओ मिळून देशातील ५०० कोटी लोकांना लक्ष्य करणार आहेत. जे सध्या स्मार्टफोनचा वापर करीत नाहीत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32VEJPL

Comments

clue frame