जिओच्या स्वस्त अँड्रॉयड स्मार्टफोनमध्ये असू शकतात हे जबरदस्त फीचर्स

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ (Reliance Jio) स्मार्टफोन मार्केट मध्ये स्पर्धा वाढवणार आहे. यासाठी कंपनी पुन्हा एकदा Orbic स्मार्टफोन सीरीज आणणार आहे. कंपनीने यासाठी गुगल सोबत पार्टनरशीप केली आहे. गेल्या काही दिवसात अनेक ऑर्बिक स्मार्टफोन्स ला सर्टिफिकेशन्स मिळाले आहेत. या दरम्यान, टेलिकॉम टॉकने आपल्या एका रिपोर्टमध्ये मॉडल नंबर RC545L ने एक रिलायन्स ऑर्बिक स्मार्टफोनच्या गुगल प्ले कन्सोल लिस्टिंगमध्ये असल्याचे म्हटले आहे. वाचाः क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि एचडी प्लस डिस्प्ले लिस्टिंगच्या माहितीनुसार, हा फोन आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉयड १० गो एडिशनचा असू शकतो. प्रोसेसरमध्ये हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन QM215 मोबाइल प्लॅटफॉर्म दिला आहे. फोनमध्ये मोठे बेजल्स आणि 18:9 चा आस्पेक्ट रेशियो दिला आहे. तसचे एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. वाचाः १ जीबी असू शकते रॅम गुगल प्ले कन्सोलच्या लिस्टिंगमध्ये या फोनच्या रॅम संबंधी अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. एन्ट्री लेवल स्वस्त फोन असल्याने असे मानले जात आहे. या फोनमध्ये १ जीबी रॅम मिळणार आहे. हा फोन अड्रीनो ३०६ जीपीयू देण्यात आला आहे. या लिस्टिंगला टिप्स्टर मुकुल शर्माने स्पॉट केले होते. वाचाः इतकी असू शकते किंमत हा फोन एक एन्ट्री लेवल हँडसेट असणार आहे. हा फोन ४० डॉलर म्हणजे ३००० रुपयांच्या किंमतीच्या जवळपास असू शकते. काही वर्षाआधी कंपनीने ४ जी फीचर फोन मार्केटमध्ये धुमाकूळ घातला होता. त्यामुळे असे मानले जात आहे की, या अँड्रॉयड स्मार्टफोनमध्ये पुन्हा एकदा धुमाकूळ घातला जावू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kZ3Gjx

Comments

clue frame