नोकियाने आणले दोन जबरदस्त बजेट स्मार्टफोन, दमदार आहेत फीचर्स

नवी दिल्लीः Nokia ने आपले बजेट स्मार्टफोन्सची रेंज वाढवत दोन नवीन डिव्हाइस - Nokia 3.4 आणि Nokia 2.4 ला लाँच केले आहे. बजेट सेगमेंट असूनही हे दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये एचडी डिस्प्ले आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर यासारखे खास फीचर दिले आहेत. HMD Global ने सध्या या दोन्ही स्मार्टफोन्सला यूरोपमध्ये लाँच केले आहे. वाचाः किंमत किती यूरोपमध्ये नोकिया ३.४ ची सुरुवातीची किंमत १५९ यूरो म्हणजेच १३ हजार ७०० रुपये आहे. तर नोकिया २.४ ला कंपनीने ११९ यूरो म्हणजेच १० हजार ३०० रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. दोन्ही स्मार्टफोन तीन कलर ऑप्शनमध्ये चारकोल, डस्क आणि Fjord मध्ये आणले आहे. नोकिया ३.४ ची सेल ऑक्टोबर आणि नोकिया २.४ ची सेल या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे. कंपनी दोन्ही डिव्हाईसला भारतात लवकरच लाँच करण्याची शक्यता आहे. वाचाः नोकिया ३.४ चे वैशिष्ट्ये फोनमध्ये 720x1560 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.३९ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ड्यूल नॅनोच्या या फोनमध्ये आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. फोन दोन व्हेरियंट मध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये येतो. फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो. फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 460 SoC चिपसेट दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा ऑफर करते. सेल्फी कॅमेरा डिस्प्लेत पंच होल आतमध्ये दिले आहे. वाचाः नोकिया ३.४ मध्ये 4000mAh बॅटरी दिली आहे. १० वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. रियर फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येणाऱ्या या फोनमध्ये डेडिकेटेड गुगल असिस्टेंड बटन दिले आहे. हा फोन अँड्रॉयड १० ओएसवर काम करतो. वाचाः नोकिया २.४ चे वैशिष्ट्ये हा फोन २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज आणि ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे. ५१२ जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येवू शकते. मीडियाटेक हीलियो P22 SoC प्रोसेसर दिला आहे. अँड्रॉयड १० ओएस वर काम करणाऱ्या या फोनध्ये 720x1600 पिक्सल रेजॉलूशन दिला आहे. तसेच फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली आहे. फोनच्या रियरमध्ये दोन कॅमेरे दिले आहेत. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर सुद्धा दिला आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. कनेक्टिविटीसाठी सर्व स्टँडर्ड ऑप्शन दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HjUiIx

Comments

clue frame