मस्तच! सॅमसंगचे ६ स्मार्टफोन झाले स्वस्त, पाहा नवीन किंमती

नवी दिल्लीः फेस्टिव सीजनआधी दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने आपल्या ६ जबरदस्त स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. सॅमसंगने ज्या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. त्यात आणि Galaxy M-Series च्या जबरदस्त स्मार्टफोनचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या किंमती १५०० रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत. वाचाः हा गॅलेक्सी ए सीरीजचा सर्वात महाग फोन आहे. या स्मार्टफोनची किंमत ३० हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या फोनच्या किंमतीत १५०० रुपयांची कपात करण्यात आल्याने हा फोन २९ हजार ४९९ रुपयांना मिळत आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या मागे ४ कॅमेरे दिले आहेत. फोनमध्ये मेन कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आहे. हा फोन दोन व्हेरियंटमध्ये येतो. ८ जीबी रॅमच्या फोनच्या किंमतीत १५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा फोन आता २४ हजार ४९९ रुपयांना खरेदी करता येईल. ६ जीबी रॅमच्या फोनवर १ हजार रुपयांची कपात करण्यात आली. हा फोन आता २२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा, ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 4000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः Samsung Galaxy A31 हा फोन १ हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. तसेच ICICI कार्डवरून पेमेंट केल्यास १ हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. यानंतर हा फोन १८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. यात ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा, इनफिनिटी-यू sAMOLED डिस्प्ले आणि 5000mAh मिळते. Samsung Galaxy A21s सॅमसंगच्या या फोनवर १ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. ६ जीबी रॅमचा फोन १६ हजार ४९९ रुपये, ४ जीबी रॅमचा फोन १४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा, इनफिनिटी ओ डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः Samsung Galaxy M01s सॅमसंगाचा हा फोन स्वस्त फोन आहे. याच्या किंमतीत ५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. या फोनच्या डिस्काउंटनंतर फोन ९ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. फोनमध्ये 13MP + 2MP चा रियर कॅमेरा, 8MP चा फ्रंट कॅमेरा आणि 4000mAh बॅटरी दिली आहे. Samsung Galaxy M01 Core या फोनच्या किंमतीत सुद्धा ५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. डिस्काउंटनंतर फोनच्या 1GB+16 GB मॉडलची किंमत४ हजार ९९९ रुपये आणि 2GB+ 32GB मॉडलची किंमत ५ हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cd2WUz

Comments

clue frame