आता मोबाईलमधी प्रायव्हेट डेटा राहील १०० टक्के सुरक्षित; अल्ट झेड लाइफचा आनंद घ्या सॅमसंग गॅलेक्सी ए 71 आणि ए 51 सह

अल्ट झेड लाइफचा भाग म्हणून सॅमसंग स्मार्टफोनमध्ये  एक अनोखं क्विक स्विच नावाचं फिचर खास तुमच्यासाठी तुमच्यासाठी आलंय. यासाठी तुम्हाला पॉवर बटनवर डबल क्लिक करावं लागेल, जेणेकरुन तुम्हाला प्रायवेट आणि पब्लिक अशा मोडमध्ये प्रवेश करता येईल. यात तुम्ही तुमचा डाटा, ऍप्लिकेशन आणि बरंच काही प्रायवेट ठेवू शकता. 

पार्टनर फिचर, एचटी ब्रँड स्टुडिओ

स्मार्टफोन हा आपल्या जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. खासकरुन सध्याचं जनरेशन स्मार्टफोनवर जास्त अवलंबून आहे. त्यांना काम आणि खेळ अशा दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन ठेवावे लागते. कल्पना करा की, तुम्ही सकाळी पत्रकाराचं काम करता आणि त्यानंतर तुम्ही काही तासांसाठी डीजे बनता. तुमच्या मोबाईमध्ये मोठ्या प्रमाणात संवेदनशील माहिती असू शकते. तुमच्या मोबाईलमध्ये काही फोटो, व्हिडिओ किंवा कामासंबंधी असा काही डाटा असू शकतो जो तुम्हाला इतर कोणाला दाखवायचा नाही. त्यामुळे आपला फोन कोणच्या हाती जाऊ नये, यासाठी आपण नेहमीच खरबदारी घेत असतो. याठिकाणी प्रायव्हेसीचा मुद्दा पुढे येतो.

प्रायव्हेसी केवळ बाहेरच्या लोकांपर्यंत मर्यादीत नसते, तर आपले मित्र आणि कुटुंबातील सदस्यांपासूनही आपल्याला माहिती प्रायवेट ठेवायची असते. आपण आपला फोन दुसऱ्याला देताना नेहमी काळजीत असतो. आपली खासगी माहिती कोणाकडून पाहिली जात आहे का, याबाबत आपण नेहमी चिंता करत असतो.

आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी जागरुक असणाऱ्या सॅमसंगनने उद्योग विश्वात पहिल्यांदा नाविन्यपूर्ण असलेले  क्विक स्विच आणि इंटेलिजेन्ट कंटेंट सजेशन प्रायव्हेली फिचर गॅलेक्सी ए 71 आणि ए 51 साठी घेऊन आला आहे. हे फिचर 'मेक इन इंडिया' अंतर्गत आणण्यात आले आहे. यामुळे वापरकर्त्यांना विशेषत: Z जनरेशनला आपला स्मार्टफोन शेअर करतानाची चिंता दूर होईल आणि त्यांना अल्ट झेड लाइफ जगता येईल. अल्ट झेड लाइफ तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्याने जगण्याची मुफा देते. यात तुम्हाला तुमच्या प्रायव्हेसीवर होणाऱ्या अतिक्रमणाची काळजी करण्याची गरज नाही.

बोटांच्या टोकावर तुमची प्रायव्हेसी

आपल्याला माहीत आहे की तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आणि  सेल्फी घेत असते. अनेकांना या गोष्टी अगदी प्रायव्हेट ठेवायच्या असतात, त्यांना हे कोणीही पाहू नये असं वाटतं. यापूर्वी एकच पर्याय होता तो म्हणजे पूर्ण गॅलरीच लॉक करणे, पण जर मित्राने पासवर्ड मागितला, तर तुम्ही काय कराल? तुमची इच्छा नसताना तुम्ही त्याला पासवर्ड सांगाल. येथेच तुमची प्रायव्हेसी जाईल. 

क्विक स्विच असल्यास तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त दोनदा पॉवरचे बटन दाबायचे आहे, जेणे करुन तुम्हाचा फोन प्रायवेट आणि पब्लिक मोडमध्ये जाईल. त्यामुळे तुमचे फोटो, ऍप आणि बरंच काही प्रायवेट राहील. (होय, तुमची प्रायवेट माहिती कोणालाही पाहता येणार नाही)

सोपं उदाहरण घेऊ, तुम्ही ऑफीसमध्ये आहात आणि तुमच्या सहकाऱ्याला तुम्ही तुमच्या बॉसवर बनवलेला मिम्स दाखवत आहात. पण अचानक, तुमच्या बॉसची एन्ट्री होते आणि तो तुम्हाला तुमचा फोन देण्याची मागणी करतो. तुम्ही काय कराल? अशाच परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अभिनेत्री राधिका मदन क्विक स्विचचा वापर करते. राधिका याच पद्धतीने आपली प्रायवेट माहिती आपल्या बॉयफ्रेंड आणि बहिणीपासून लपवून ठेवते. आपल्याला माहिती आहे की, कोणालातरी आपल्या फोनमध्ये आपण काय करतोय हे जाणून घेण्यात खूप रस असतो. खरं ना?

सॅमसंग आपल्या नवकल्पनांसाठी ओळखले जाते आणि आता क्विक स्विच फिचर आणून ते पुन्हा सिद्ध केले आहे. हे फिचर  गॅलेक्सी ए 71 आणि ए 51 स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. क्विक स्विच तुम्हाला अल्ट झेडचा पूर्वी कधीही न घेतलेला अनुभव देईल. यामध्ये इंटेलिजेन्स कंटेंट सजेशन देखील आहे, हा क्विक स्विचचाच विस्तार आहे. यामध्ये तुम्हाला स्वत:हून फोटो प्रायवेट फोल्डरमध्ये मुव्ह करण्याचे सजेशन देण्यात येईल, जे सॅमसंग नॉक्सद्वारे सुरक्षित राहिल. काही लोक, त्यांचे चेहरे आणि फोटोसुद्धा तुम्ही यात डिफाईन करु शकता. ज्यामुळे तुम्हाला आपोआप तुमचे फोटो प्रायवेट गॅलरीमध्ये ठेवण्याचे सजेशन देण्यात येईल. जेणेकरुन त्यांना कोणीही अॅक्सेस करु शकणार नाही.

योग्य किंमतीत फ्लॅगशिप फिचर

सॅमसंगने अगदी योग्य किंमतीत सर्वोत्तम स्मार्टफोन फिचर दिले आहे. दोन्ही फोनमध्ये इन्फिनिटी-ओ सॅमॉलेड प्लस डिस्प्ले, स्लीक प्रिझम क्रश डिझाइन, क्वाड-कॅमेरा मॉड्यूल आणि फ्लॅगशिप कॅमेरा फिचर जसे सिंगल टेक आणि नाईट हायपरप्लेस सारखी  प्रीमियम फिचर्स आहेत.

सिंगल टेक फिचरने तुम्हाला 3 ते 10 सेकंदात 14 प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ (10 फोटो आणि 4 व्हिडिओ) काढता येतात. यामध्ये काही शैलीकृत इमेज, एक लघु मुव्ही, काही जीआयएफ अ‍ॅनिमेशन आणि बरेच काही समाविष्ट आहे. विशेज म्हणजे हे सर्व तुम्हाला एका अल्बममध्ये मिळेल. आपल्याला फक्त निवड करायची आहे, त्यानंतर इमेज सोशल मीडियावर आपलं काम करेल.

नाईट हायपरप्लेसने तुम्ही कमी उजेडात चांगले हायपरप्लेस व्हिडिओ शुट करु शकता. आपल्या रात्रीच्या भटकंतीसाठी हे फिचर तुम्हाला खूप मदतीचे ठरु शकते. तसेच रात्रीच्या लाइफसाठी ओळखल्या जाणाऱ्या एखाद्या शहराची तुम्हाला सफर करायची झाल्यास, या फिचरच्या माध्यमातून तुम्ही असामान्य व्हिडिओ शूट करु शकता.

गॅलेक्सी ए 71 चे एक फिचर म्हणजे बॅटरी लाइफ.  4,500 एमएएच बॅटरी जी आपल्याला एका दिवसापेक्षा जास्त काळ टिकते! वाचा, बेन्ज-वॉच, गेम खेळा - आपल्याला आवडत असलेल्या सर्व गोष्टी कोणत्याही व्यत्ययाशिवाय करा. आपल्याला बॅक 64 एमपी कॅमेरा, 25w वायर्ड चार्जिंग आणि 6.7 इंचाचा मोठा एमोलेड डिस्प्ले फोनसोबत मिळेल.

गॅलेक्सी A51 ची ए 71 सारखीच डिझाईन आहे.  6.5 इंचाची एमोलेड स्क्रीन, 48 एमपी कॅमेरा,  4,000 एमएएच बॅटरी 15w फास्ट चार्जिंगसह आणि बॉक्सच्या बाहेर एक यूआय 2.0 या फोनमध्ये आहे.

अधिक सुरक्षेसाठी सॅमसंग नॉक्स

एक पाऊल पुढे जात, सॅमसंगने नॉक्स नावाच्या त्याच्या बहु-स्तरित संरक्षण-ग्रेड सुरक्षा प्लॅटफॉर्मसह अतिरिक्त सुरक्षा प्रदान केली आहे. हे स्मार्टफोनच्या हार्डवेअर चिपमध्ये अंगभूत आहे. नॉक्स प्रायवेट फायली, सॅमसंग पे ट्रान्झेक्शन पे, पासवर्ड, फोटो, व्हिडिओ आणि आपल्या फोनच्या आरोग्यासह डेटा अलग ठेवते, एनक्रिप्ट करते आणि सुरक्षित करते.

तुम्हालाही अल्ट झेड लाईफचा अनुभव घ्यायचा आहे का?  गॅलेक्सी ए 71 आणि ए 51 रिटेल स्टोर, Samsung.com, इ-कॉमर्स प्लटफॉर्मवर उपलब्ध आहे. सध्या या स्मार्टफोनसाठी आश्चर्यकारक ऑफर सुरु आहेत.  गॅलेक्सी ए 71 वर 2,600 रुपये आणि गॅलेक्सी  ए 51 वर 1,500 रुपयांची घसघशीत सुट देण्यात येत आहे. ही लिमिटेड पिरियड ऑफर असल्याने आणखी वाट पाहू नका.



from News Story Feeds https://ift.tt/330anMd

Comments

clue frame