64MP आणि 5000mAh बॅटरीचा रियलमी ७ चा सेल, खास ऑफरमध्ये खरेदी करा फोन

नवी दिल्लीः रियलमीचा जबरदस्त मिड रेंज स्मार्टफोन रियलमी ७ चा आज सेल मध्ये खरेदी करता येवू शकतो. आज दुपारी १२ वाजता सेलला फ्लिपकार्टवर सुरुवात होणार आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा, डार्ड चार्जिंग आणि दमदार गेमिंग प्रोसेसर सोबत येतो. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये आज खरेदी अनेक आकर्षक ऑफर देण्यात येत आहेत. वाचाः किंमत आणि ऑफर रियलमी ७ च्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबीच्या स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. फोनला जर एचएसबीसी बँक क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास ५ टक्के (१५०० रुपये) पर्यंत सूट मिळणार आहे. तसेच फोन फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. वाचाः फोनला आज नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत खरेदी करता येवू शकते. नो कॉस्ट ईएमआयची सुरुवातीची किंमत १६६७ रुपये प्रति महिना आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनमला १४ हजार २५० रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. वाचाः रियलमी ७ चे खास वैशिष्ट्ये फोनमध्ये 2400x1080 पिक्सल रेजॉलूशन देण्यात आले आहे. ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनला कॉर्निंग गोरीला ग्लास प्रोटेक्शन दिले आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये तुम्हाला हीलियो जी ९५ गेमिंग प्रोसेसर मिळेल. हा फोन अँड्रॉयड १० बेस्ड Realme UI वर काम करतो. फोटोग्राफीसाठी यात ६४ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा इन डिस्प्ले कॅमेरा दिला आहे. रियलमीच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. ३० वॉट फास्ट डार्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33Yg3Wh

Comments

clue frame