सॅमसंगचा स्वस्त 5G फोन Galaxy A42 5G, खास प्रोसेसर मिळणार

नवी दिल्लीः या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने आपला सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोन ची घोषणा केली होती. कंपनीने याच्या वैशिष्ट्यांपासून किंमत आणि उपलब्धतेची माहिती शेयर केली होती. आतापर्यंत फोनच्या प्रोसेसरसंबंधी खुलासा करण्यात आला नव्हता. परंतु, आता ताज्या एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे की, गॅलेक्सी ए४२ ५जी स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७५० जी प्रोसेसरचा वापर केला जाणार आहे. वाचाः स्नॅपड्रॅगन 750G चिपसेटचा पहिला स्मार्टफोन Dealntech ने या स्मार्टफोनच्या गीकबेंचच्या सॉर्स कोडचा एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे. यात डिव्हाइसचे मॉडल नंबर SM-A426B दिले आहे. सोर्स कोडवरून हे उघड झाले आहे की, सॅमसंग गॅलेक्सी A42 5G मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर असणार आहे. तसेच Adreno 619 जीपीयू मिळणार आहे. स्नॅपड्रॅगन ७५० जी चिपसेटचा हा पहिला स्मार्टफोन असू शकतो. याआधी आलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले की, फोनमध्ये स्न्रॅपड्रॅगन 690 5जी प्रोसेसर मिळू शकतो. वाचाः किती असेल किंमत स्मार्टफोन ची विक्री यूरोपमध्ये नोव्हेंबर पासून सुरू होईल. याची किंमत ३६९ यूरो म्हणजे जवळपास ३१ हजार ७०० रुपये असू शकते. हा फोन तीन कलर ऑप्शन ब्लॅक, व्हाइट आणि ग्रे मध्ये येईल. फोनमध्ये ६.६ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. यात 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाईल. सेल्फी आणि व्हिडिओ साठी या फोनमध्ये २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाणार आहे. फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा दिले जाणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hXxRpn

Comments

clue frame